Buddha Gaya Tourism Saam TV
लाईफस्टाईल

Buddha Gaya Places To Visit: नयनरम्य अशी बुद्धगयेतील प्रसिद्ध ठिकाणे; गौतम बुद्धांबाबत जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या

Must Visit Places in Buddha Gaya: ठिकाणाला ज्ञानाची गंगा म्हणून देखील ओळखले जाते. चला तर मग बुद्धगयेमधील गौतम बुद्धांच्या आयुष्याशी जोडलेल्या काही प्रसिद्ध ठिकाणांची माहिती जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

बुद्धगया हे बिहारमधील गया राज्यातील एक गाव आहे. येथे गौतम बुद्ध यांच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे भारतात या ठिकाणाला सर्वाधीक लोकप्रियता आणि ऐतिहासीक महत्व देखील आहे. या ठिकाणाला ज्ञानाची गंगा म्हणून देखील ओळखले जाते. चला तर मग बुद्धगयेमधील गौतम बुद्धांच्या आयुष्याशी जोडलेल्या काही प्रसिद्ध ठिकाणांची माहिती जाणून घेऊ.

बोधीवृक्ष

पौराणीक कथांमध्ये तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात देखील दिलेल्या माहितीनुसार, बोधीवृक्षाखाली गौतम बुद्धांनी ध्यान साधना केली होती. त्यांना वैशाखी पौर्णिमेला येथे ज्ञान प्रप्ती झाली. त्यामुळे भारतासह अन्य देशातील व्यक्ती देखील बोधी वृक्ष पाहण्यासाठी येथे भेट देत असतात.

महाबोधी मंदिर

बुद्धगयामधील महाबोधी मंदिर हे विशेष आकर्षणाचे स्थळ आहे. येथे गौतम बुद्धांची सुबक अशी दगडांमधील मुर्ती आहे. हे मंदिर राजा सम्राट अशोक यांच्या काळात त्यांनी बांधले होते. मुळ बोधीवक्षाच्या चारही बाजुंनी या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.

थाई विहार

बुद्ध धर्मात विहार बांधण्याची जुनी परंपरा आहे. बौद्ध धर्म ज्या ठिकाणी पोहोचला त्या ठिकाणी एक विहार किंवा स्तूप बांधले जाते. त्याचप्रकारे गया येथे देखील थाई विहार आहे. येथे सोन्याने मढवलेलं सोन्याचं छत असलेलं मंदिर आहे. त्यामुळे येथे लाखो भारतीय आणि बौद्ध अनुयायी भेट देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

Mumbai Crime : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरट्या बाप बेटाच्या जोडीला अटक

GST नोंदणी आणखी सोपी होणार,फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार

Salt Remedies: आयुष्यात समस्या? तर मीठाशी संबधित 'हे' उपाय कराच, भाग्य उजळेल

SCROLL FOR NEXT