BSNLs 4G Service Launch Saam Tv
लाईफस्टाईल

BSNL's 4G Service Launch : बीएसएनल लॉंच करणार 4G नेटवर्क; सिमकार्डही मिळणार फ्री, सर्वकाही जाणून घ्या

BSNL to Launch 4G Network : बीएसएनलची 4G सेवा आधी जून 2024 पर्यंत तमिळनाडूत उपलब्ध होईल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How to Activate BSNL 4G SIM : BSNL लवकरच 4G सेवा सुरू करणार आहे. एका अहवालात ही माहिती समोर आली आहे. द हिंदूच्या वृत्तानुसार, भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या माध्यमातून जून 2024 पर्यंत तामिळनाडूमध्ये 4G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे.

4G सेवांच्या रोलआउटसाठी पायाभूत सुविधांचे काम 18 महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर उपकरणे आणि सॉफ्टवेअरचे वापरासाठी डिसेंबर 2023 पर्यंत बाजारात (Market) येऊ शकते.

सर्वात आधी तमिळनाडूमध्ये बीएसनलची 4G सेवा

बीएसएनलची 4G सेवा जून 2024 पर्यंत तमिळनाडूत उपलब्ध होईल. जेव्हा स्थापना, चाचणी आणि चाचणीचे टप्पे पूर्ण होतील. त्यानंतर ही सेवा उपलब्ध होईल.

तमिळनाडूनंतर केरळला 4G सेवा मिळण्याची शक्यता आहे. कारण केरळचा बीएसएनलच्या यशात मोठे योगदान आहे. आगामी सेवेचा लाभ घेण्यासाठी BSNL ने ग्राहकांना (Consumer) त्यांच्या सेवा केंद्रांवरून मोफत 4G सिम घेण्यास सांगितले आहेत.

लवकरच सुरू होणार 5G सेवा

बीएसएनलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका सॉफ्टवेअर अपग्रेडमुळे BSNL ला त्यांची 4G सेवा आपोआप 5G मध्ये बदलता येईल. यासह, 4G सेवा सुरू केल्यानंतर लवकरच उत्तम कनेक्टिव्हिटीसह 5G सेवा सुरू करणार आहे. हायस्पीड इंटरनेट सेवा देणे हा त्यामागचा उद्देश आहे.

रिपोर्टनुसार बीएसएनएल 4G लॉंचनंतर (Launch) लगेचच 5G सेवाही उपलब्ध होणार आहे. BSNL ने 4G लाँच झाल्यानंतर लगेचच त्यांची 3G सेवा बंद करणार आहे. परंतु कंपनी 2G सेवा सुरू ठेवणार असल्यााची माहिती समोर येत आहे. BSNLनुसार, त्यांच्या कमाईचा एक महत्त्वपूर्ण भाग 2G सेवांमधून येतो. जे व्हॉइस कॉलसाठी महत्त्वाचे फिचर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT