Recipes In 5-minute Saam TV
लाईफस्टाईल

Recipes In 5-minute: नाश्त्याला बनवा झटपट मसाला चीज ब्रेड; 5 मिनिट्स रेसिपी

5-minute Recipes For Snacks: वेळ कमी असल्याने झटपट काहीतरी बनवावे लागते. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी अगदी 5 मिनिटांत तयार होणारी मसाला चीज ब्रेड रीसिपी घेऊ आलो आहोत. ही रेसिपी अगदी सिंपल आणि सोप्पी आहे.

Ruchika Jadhav

Breakfast Recipes In Marathi:

सकाळी सकाळी सर्वांच्या घरी मोठी धावपळ असते. शाळा, कॉलेज, ऑफिसला वेळेत पोहचण्यासाठी सर्वजण घाईमध्ये असतात. अशात सकाळच्या नाश्त्यात काय बनवावे याचं मोठं टेन्शन असतं. कारण सकाळी वेळ कमी असल्याने झटपट काहीतरी बनवावे लागते. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी अगदी 5 मिनिटांत तयार होणारी मसाला चीज ब्रेड रीसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी अगदी सिंपल आणि सोप्पी आहे.

मसाला चीज ब्रेड असं या डिशचं नाव आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीप्रमाणे

ब्रेड

चीज

मलासा

तेल

बटर

मीठ

कोथिंबीर

अशा फक्त 7 गोष्टींची आवश्यकता आहे.

कृती

मसाला चीज ब्रेड बनवण्यासाठी सर्वात आधी एक पॅन घ्या. त्यात ब्रेड गोलाकार कट करून ठेवा. पॅनवर थोडं बटर टाका. त्यानंतर त्यात मसाला, मीठ आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाका. हे सर्व मिश्रण एकजीव करा आणि 1 मिनिट गॅसवर गरम होऊ द्या. पुढे यामध्ये गोलाकार कापलेले ब्रेड ठेवा. सर्व मसाला या ब्रेडला लावून घ्या.

आता तुम्ही या बेडवर फक्त चीज टाकून खाऊ शकता. किंवा त्यावर ब्रेड एका सँडविच पॅनमध्ये ठेवा. त्यात आधी थोडे बटर लावा. त्यानंतर पॅनवर तयार ब्रेड ठेवा. पुढे या ब्रेडमधील एका स्लाइसवर चीज किसून टाका. आणि त्यावर दुसरा एक ब्रेड स्लाइस ठेवा. 2 मिनिटे गरम झाल्यावर तयार झाला तुमचा ब्रेड चीज मसाला.

ही डिश तुम्ही तुमच्या मुलांना देखील टिफीनमध्ये देऊ शकता. काहीतरी वेगळं असल्याने लहान मुलं देखील आवडीने खातात. या ब्रेडसोबत सॉस किंवा दुसरी एखादी चटणी हवी असेही नाही. तुम्ही नुसता हा ब्रेड खाल्ला तरी चवीला छान लागतो. ही रेसिपी इतकी सोप्पी आहे की मुलं देखील घरी आई नसताना झटपट बनवू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT