Brain Stroke  Saam Tv
लाईफस्टाईल

Brain Stroke : तरुणांनो, काळजी घ्या! ३०० पैकी ७७ रुग्णांना ब्रेन स्टोकचा धोका, संशोधनातून सिद्ध

Stroke In Youngster : मिळालेल्या माहितीनुसार न्यूरोलॉजी विभागात दाखल झालेल्या २० वर्षाखालील प्रत्येकी १०० रुग्णांपैकी दोघांना स्ट्रोकचा झटका आला आहे. यामध्ये २१ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांमध्ये याची समस्या अधिक गंभीर स्वरुपाची पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Stroke Signs First :

मेंदू हा आपल्या शरीराचा मुख्य अवयव. आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांचे कार्य सुरळीत करण्यासाठी मेंदूची भुमिका अधिक महत्त्वाची ठरते. मेंदूला चालना मिळाल्यानंतरच आपल्या शरीराच्या हालचाली सुरु होतात.

परंतु, यातील सगळ्यात मोठा आणि गंभीर आजार (Disease) स्ट्रोक. स्ट्रोकमध्ये मेंदूचा रक्तप्रवाह थांबतो. या आजाराची लक्षणे बरेचदा वयोवृद्धांमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. मिळालेल्या माहितीनुसार न्यूरोलॉजी विभागात दाखल झालेल्या २० वर्षाखालील प्रत्येकी १०० रुग्णांपैकी दोघांना स्ट्रोकचा झटका आला आहे. यामध्ये २१ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांमध्ये याची समस्या अधिक गंभीर स्वरुपाची पाहायला मिळाली.

मागच्या वर्षभरात यामध्ये ३०० पैकी ७७ रुग्णांमध्ये ब्रेन स्ट्रोकचा धोका आढळून आला. यामध्ये सर्वाधिक तरुणांची नोंद झालेली पाहायला मिळाली. तरुणांची बदलेली जीवनशैली (Lifestyle), अनेक वाईट सवयी (Habits) आणि जुन्या आजारांचा यामुळे याचा धोका अधिक वाढत आहे.

एम्सच्या आकडेवारीनुसार, स्ट्रोकच्या प्रकरणांमध्ये सर्वात मोठे कारण उच्च रक्तदाब. याची लक्षणे कोणती? काळजी कशी घ्याल? जाणून घेऊया

1. स्ट्रोकची लक्षणे काय?

मेंदूच्या कोणत्याही भागामध्ये पुरेशा प्रमाणात रक्त पुरवठा न झाल्याने स्ट्रोक येतो. मेंदूच्या पेशींमध्ये ऑक्सिजनची कमतरता असते. हळूहळू त्यातील पेशी मृत होतात. याचे कारण रक्तवाहिन्यांमधील अडथळे किंवा मेंदूतील रक्तस्त्राव यामुळे हे घडते. याची लक्षणे कोणती जाणून घेऊया

  • चक्कर येणे

  • शरीराच्या एका भागात अर्धांगवायू

  • बोलण्यात अडचण येणे

  • धुसर दिसणे

  • सततची डोकेदुखी

  • शरीरात सुन्नपणा जाणवणे

2. काळजी कशी घ्याल?

1. आहार

आहाराचा आरोग्यावर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे सकस आहार घ्या. तुमच्या आहारात फायबर, निरोगी पदार्थ आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश करा. फायबर आणि हेल्दी फॅट्स कोलेस्टेरॉल कमी करतात. ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळे थांबतात. प्रोसेड फूडचा आहारात समावेश करु नका. यामुळे जळजळ होऊन रक्तदाब वाढू शकतो.

2. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे

रक्तदाब वाढल्यामुळे पक्षाघाताचा धोका अधिक असतो. त्यामुळे बीपीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही आहारात सोडियमचे पदार्थांचा समावेश करु नका.

3. व्यायाम करा

व्यायामामुळे रक्तदाब नियंत्रणात राहाण्यास मदत होईल. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होईल. रोज काही वेळ व्यायाम करा. तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारेल. लठ्ठपणा आणि मधुमेह सारख्या आजारांना आळा बसेल.

4. धुम्रपान करा

अतिप्रमाणात धुम्रपान केल्याने हृदयावर नकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. धुम्रपान केल्याने रक्तदाब देखील वाढू शकतो. ज्यामुळे स्ट्रोक येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

SCROLL FOR NEXT