Dark Spots Treatment: त्वचेवरील डाग होतील आठवड्याभरात गायब, हा घरगुती उपाय करुन पाहा

Skin Care Tips : सुंदर दिसणे कोणाला आवडत नाही. वयात आलेल्या प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते. परंतु, चेहऱ्यावर येणारे पिंपल्स आणि डागामुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य सुंदर होण्याऐवजी ते खराब होते. यामुळे आपली त्वचा निस्तेज होते.
Dark Spots Treatment
Dark Spots TreatmentSaam tv
Published On

Vitamin C Serum Benefits :

सुंदर दिसणे कोणाला आवडत नाही. वयात आलेल्या प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते. परंतु, चेहऱ्यावर येणारे पिंपल्स आणि डागामुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य सुंदर होण्याऐवजी ते खराब होते. यामुळे आपली त्वचा निस्तेज होते.

सततच्या प्रदूषणामुळे व अनेक केमिकल्स प्रॉडक्टचा वापर चेहऱ्यावर केल्यास त्वचा (Skin) खराब होते. चेहरा धुण्यापासून ते सुकवण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग पडतात. तुमच्या ही चेहऱ्यावर सतत डाग पडत असतील तर आणि चेहरा चमकदार आणि टोन्ड ठेवायचा असेल तर हा उपाय (Remedies) करुन पाहा.

व्हिटॅमिन सी सीरम लावण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने धुवा आणि नंतर मऊ टॉवेलने पुसून चेहऱ्यावर टोनर लावा. नंतर 2-3 मिनिटांनंतर, व्हिटॅमिन (Vitamins) सी सीरम लावा काही वेळ तसेच राहू द्या. काही वेळाने मॉइश्चरायझर लावा. जर तुम्ही हे सिरम सकाळी लावत असाल तर सनस्क्रीन लावायला विसरू नका. जर तुम्ही ते रात्री लावत असाल तर दुसऱ्या दिवशी सकाळी सनस्क्रीन लावा.

Dark Spots Treatment
Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा ड्राय का पडते? Soft Skin साठी या टिप्स फॉलो करा
  • व्हिटॅमिन सी सीरम वापरल्याने, तुमचा चेहरा आतून हायड्रेटेड होतो.

  • व्हिटॅमिन सी सीरम वापरल्याने आपल्या चेहऱ्याचे रक्ताभिसरण चांगले राहते ज्यामुळे चेहरा चमकदार होतो. इतर कोणत्याही स्किन केअर उत्पादनासोबत देखील वापरू शकता.

  • व्हिटॅमिन सी सीरम आपल्या त्वचेतील जखमा भरून काढण्याचे काम करते. हे सीरम आपल्या त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते.

  • व्हिटॅमिन सी सीरम वापरल्याने चेहऱ्याचा लालसरपणा कमी होतो आणि हायपरपिग्मेंटेशनच्या समस्येपासून आराम मिळतो.

  • डोळ्यांखालील काळ्या वर्तुळाच्या समस्येपासून तुमची सुटका होईल.

  • व्हिटॅमिन सी सीरम आपल्या त्वचेमध्ये कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्याचे काम करते, ज्यामुळे त्वचेची सैल होण्याची समस्या दूर होते.

  • व्हिटॅमिन सी सीरम आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचवण्याचे काम करते.

  • व्हिटॅमिन सी सीरममध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास मदत होते.

  • व्हिटॅमिन सी सीरम आपल्या त्वचेला पोषण देते. ते वापरल्याने आपल्या चेहऱ्याची चमक दिवसेंदिवस वाढते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com