Brain Health Saam Tv
लाईफस्टाईल

Brain Health : रोजच्या या सवयींमुळे मेंदूवर होतो परिणाम, ताण कमी करण्यासाठी या गोष्टी करुन पाहाच

Five ways to keep your brain healthy : शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा अवयव मेंदू मानला जातो. जो आपल्या संपूर्ण शरीराला कंट्रोल करतो. तसेच कोणतेही काम करण्यासाठी शरीराला संकेत देतो. यासाठी मेंदूची काळजी घेणे गरजेचे असते.

कोमल दामुद्रे

Brain Health Tips :

शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा अवयव मेंदू मानला जातो. जो आपल्या संपूर्ण शरीराला कंट्रोल करतो. तसेच कोणतेही काम करण्यासाठी शरीराला संकेत देतो. यासाठी मेंदूची काळजी घेणे गरजेचे असते.

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि वाढत्या कामाच्या ताणामुळे आपल्या मेंदूची चालना कमी होते. सततच्या कामामुळे शारीरिक आणि मानसिक आराम मिळत नाही. सध्या ही समस्या तरुणांमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. चिंता आणि तणावामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यासाठी नियमितपणे काही गोष्टी करायला हव्या ज्यामुळे थकवा कमी होईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. ध्यान

आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी ध्यान करणे फायदेशीर ठरेल. यामुळे तुमच्या मनाला आराम मिळेल. तसेच तणाव कमी झाल्यास कामात देखील लक्ष लागते. याशिवाय ध्यानामुळे चिंता, नैराश्य कमी होते. यासाठी नियमितपणे १५ मिनिटे ध्यान करण्याचा प्रयत्न करा.

2. पुरेशी झोप घ्या

झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूची सर्तकता कमी होते. त्यामुळे तणाव वाढून मेंदू जलद गतीने काम करु शकत नाही. याशिवाय झोपेच्या कमतरतेमुळेही अनेक आजार (Disease) होऊ शकतात. म्हणून दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्या.

3. निरोगी आहार

आहाराचा तुमच्या मेंदूवरही परिणाम होतो. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ तुमची स्मरणशक्ती कमकुवत करतात. त्यामुळे मेंदूची सर्तकताही कमी होते. त्यामुळे मेंदू तल्लख होईल. त्यासाठी आहारात हिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा या पदार्थांना (Food) आहाराचा भाग बनवा.

4. व्यायाम करा

निरोगी राहाण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम केल्याने शरीराला चालना मिळते. ज्यामुळे तणाव (Stress) कमी होऊन मूड सुधारतो. तसेच मेंदू देखील चांगले काम करतो. यासाठी दररोज ३० मिनिटे व्यायाम करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT