High Blood Pressure google
लाईफस्टाईल

High Blood Pressure: BP च्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने वाढतील हे ४ आजार, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती

BP Control: बीपीची लक्षणे दुर्लक्षित केल्यास स्ट्रोक, हार्ट अटॅक, किडनी नुकसान आणि दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतो. वेळेवर तपासणी आणि जीवनशैलीत बदल केल्यास गंभीर आजार टाळता येऊ शकतात.

Sakshi Sunil Jadhav

  • बीपीची सामान्य लक्षणे वेळीच ओळखा

  • बीपी दुर्लक्षित केल्यास गंभीर आजार होऊ शकतात

  • बीपी नियंत्रणासाठी उपाय

प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्यांना कोणतेना कोणते आजार किंवा सामान्य समस्या होतात. वय जसंजसं वाढत जातं, तसतशा समस्या वाढत जातात. लहानपणीची दुखणी किंवा आजारपणं ही वेगळी असतात. कारण तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतो. लहानपणी आपली खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप काळजी घेतली जाते. पण जसंजसं वय वाढतं तेव्हा त्याविषयीचे निर्णय आपले आपण घ्यायला लागतो. पुढील माहितीत आपण वाढत्या वयात होणाऱ्या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत.

तुम्ही पाहिलंच असेल वयाची चाळीशी ओलांडली की, अनेकांना रक्तदाबाचा ( Hypertension ) त्रास व्हायला सुरुवात होते. यामध्ये तुमच्या रक्तवाहिन्यांमधला रक्तदाब वाढलेला असतो. त्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. कारण ह्रदयाला पुरेसं रक्त पंप करताना यावेळेस अडथळे निर्माण होत असतात.

जेव्हा याचं प्रमाण जास्त होतं आणि ह्रदयाला श्वास घेताना जास्त ताण द्यावा लागतो. तेव्हा एकेदिवशी तुम्हाला अचानक रक्तदाबाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. म्हणूनच याची काही लक्षण ओळखून त्यावर उपचार करणं महत्वाचं असतं.

BPच्या लक्षणांमध्ये तुम्हाला डोकेदुखीचा त्रास, धुसर दिसणं, छातीत दुखणं ही लक्षणं दिसतात. जर यावर तुम्ही वेळीच उपचार केले नाहीत तर तुम्हाला स्ट्रोक, हार्ट अटॅक, हृदय निकामी होणं, मूत्रपिंडांचं नुकसान किंवा दृष्टी कमी होणं यांसारख्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.

त्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही घरच्याघरी ही लक्षणे जाणवल्यास बीपी तपासू शकता. दोन वेगवेगळ्या दिवशी मोजलेल्या रक्तदाबामध्ये सिस्टोलिक 140 mmHg किंवा त्याहून जास्त आणि डायस्टोलिक 90 mmHg किंवा त्याहून जास्त असल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास आहे असं आपण म्हणू शकतो. पण यावर उपचार करण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. तसेच जीवनशैलीत काही बदल करणं सुद्धा गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT