blood pressure control google
लाईफस्टाईल

Blood Pressure: ही छोटी चूक ठरते BPसाठी घातक! पाणी कमी पिणाऱ्यांनी आत्ताच व्हा सावध, नाहीतर...

Hydration and BP: उन्हाळ्यात कमी पाणी पिण्यामुळे डिहायड्रेशन होऊन रक्तदाब वाढू शकतो. डॉक्टरांच्या मते, पुरेसं पाणी पिणं इलेक्ट्रोलाइट संतुलन राखतं आणि नैसर्गिकरित्या बीपी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं.

Sakshi Sunil Jadhav

वाढत्या उन्हाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची जास्त प्रमाणात आवश्यकता असते. पण अनेकांना पाणी पिण्याचं प्रचंड कंटाळा येतो. प्रवासात लोक पाण्याची बाटली घेऊन जायला कंटाळतात. काही लोक अगदी घसा सुकेपर्यंत पाणी पित नाहीत. पण याचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होतो. तसेच तुम्हाला काहीच दिवसात वाढत्या ब्लड प्रेशरच्या समस्येला सामोरं जावं लागतं. महत्वाचा मुद्दा म्हणजे अनेकांना असं वाटतं की, पाणी जास्त प्यायल्याने BP हा नैसर्गिक रित्या कमी होतो? चला जाणून घेऊयात डॉक्टरांचा सल्ला.

वाढत्या उन्हाळात शरीरातली पाण्याची कमतरता आणि वाढतं तापमान यामुळे अनेकांना उच्च रक्तदाबाचा (Hypertension) त्रास वाढताना दिसतो. डॉक्टरांच्या मते, BP नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांसोबतच जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे असतात, पण त्यातही सर्वात सोपा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे पुरेसं पाणी पित राहणं.

मानवी शरीरातले रक्त हे जवळपास 90 टक्के पाण्यापासून बनलेलं असतं. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता, म्हणजेच Dehydration झाल्याने रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे BP वाढण्याचा धोका जास्त असतो. जास्त घाम येणं, उलट्या किंवा सारखं लघवीला होणं यामुळे शरीरातले पाणी कमी होत जातं आणि त्याचा थेट परिणाम BPवर होतो.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, रोजच्या रोज आणि पुरेसं पाणी प्यायल्याने शरीरातलं सोडियम आणि इतर इलेक्ट्रोलाइट्सचा बॅलेन्स राखला जातो. हे घटक शरीरातले द्रवपदार्थांची हालचाल नियंत्रित ठेवतात आणि त्यामुळे BP हा नैसर्गिक रित्या कमी होतो. जर एखादी व्यक्ती डिहायड्रेटेड असेल, तर योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यानंतर रक्तदाब पुन्हा बॅलेन्स होऊ शकतो. त्यासाठी किमान सहा ते आठ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT