Sakshi Sunil Jadhav
शरीरामध्ये पाण्याची कमतरता असल्यास पाय दुखणे आणि पोटऱ्यांमध्ये गोळे येणे या समस्या जाणवतात.
मिनरल्सची कमतरता विशेषत: मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम असल्यास सुद्धा ही समस्या जाणवते.
पुढे आपण या समस्येवर घरगुती उपाय काय करावे हे जाणून घेणार आहोत.
दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.
रोजच्या आहारामध्ये फळांच्या रसांचा समावेश करा.
बेसिक स्ट्रेचिंगचे व्यायाम करा. झोपण्याआधी व्यायाम करणे फायदेशीर ठरेल.
तिळाचं किंवा नारळाचं तेल लावून मालिश करणे फायदेशीर ठरू शकते.
रोज ३० ते ४५ मिनिटे चालणे तसेच एका जागी बसणे टाळणे.
पाय दुखत असलेल्या भागावर गरम पॅक ठेवा.
पायांना सुज आल्यास तुम्ही थंड पाण्याने शेकवू शकता.