Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात गरमा गरम अन् हलकंफुलकं खायची प्रत्येकाची इच्छा असते.
चला तर मग झटपट कांद्याच्या घावण्याची सोपी रेसिपी तयार करूयात.
तांदूळ पीठ, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, हळद, मीठ, पाणी, तेल इ.
एका मोठ्या बाउलमध्ये तांदळाचं पीठ घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, हळद आणि मीठ घालून मिक्स करा.
थोडं थोडं पाणी घालून बारीक गुठळ्या न राहता पातळसर घावनसारखं मिश्रण तयार करा.
नॉनस्टिक तवा किंवा लोखंडी तवा मध्यम आचेवर गरम करा. थोडंसं तेल पसरवा.
तव्यावर एक पळीत घावनचं पातळ मिश्रण घाला आणि लगेच तवा हलवून ते पसरवा (डोस्यासारखं). वरून थोडं तेल सोडा.
घावन खालीून खरपूस भाजलं की पलटून दुसऱ्या बाजूनेही शेकून घ्या.
प्याज घावणे गरम गरम नारळ चटणी, टोमॅटो चटणी किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.