Mugache Sandge Recipe: खमंग मुगाचे सांडगे यंदाच्या उन्हाळ्यात बनवाच, वाचा सोपी रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

मुगाचे सांडगे रेसिपी

मुगाचे सांडगे हा पारंपरिक, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. उन्हाळ्यात बनवून ठेवले तर वर्षभर भाजीत किंवा तळून खाता येतात. ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.

Mugache Sandge Recipe

साहित्य

हिरवे मूग 2 कप, मीठ, हिंग, जिरे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर इ.

sun dried lentil dumplings

मूग भिजवा

सर्वप्रथम मूग 7 ते 8 तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.

maharashtrian sandge

वाटण तयार करा

भिजलेले मूग पाणी काढून जाडसर वाटून घ्या. यासाठी खूप कमी वेळ लागतो.

moong dal snacks

मिश्रण तयार करा

आता साहित्यात मीठ, हिंग, जिरे, ठेचलेली मिरची-लसूण आणि कोथिंबीर मिक्स करुन घ्या.

summer food preservation

संपूर्ण मिश्रण तयार करा

मुगाचं मिश्रण चांगलं फेटून हलकं आणि फुललेलं करा.

summer food preservation

सांडगे घाला

प्लास्टिक शीट किंवा कापडावर छोट्या-छोट्या गोळ्यांच्या आकारात सांडगे घाला. मग कडक उन्हात 2 ते 3 दिवस पूर्ण कोरडे होईपर्यंत वाळवा.

protein rich snacks

साठवणीच्या टिप्स

पूर्ण वाळल्यानंतर हवाबंद डब्यात साठवून ठेवा. सांडगे तळून किंवा भाजीत घालून खमंग चवीनं सर्व्ह करा.

protein rich snacks

NEXT: गॅस बर्नरवरचे काळे डाग 5 मिनिटांत गायब! ही सोपी ट्रिक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Kitchen Cleaning | google
येथे क्लिक करा