Warning signs before a heart attack saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack: हार्ट अटॅक येण्याच्या काही तास अगोदर शरीर देतं 'हे' संकेत; समजून घेतल्यास जीव वाचेल

Symptoms of Heart Attack: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. वैद्यकीय तज्ञांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही तास किंवा काही दिवस आधीच आपले शरीर धोक्याचे गंभीर संकेत देऊ लागतं

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही काळापासून हृदयविकाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येतंय. आजकाल अनेक बातम्या किंवा सोशल मीडियावरही बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला बसल्यावर किंवा डान्स करताना हार्ट अटॅक येतो. मात्र अशावेळी आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की, अशा परिस्थितीत हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही लक्षणं दिसून येतात का?

अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की, हार्ट अटॅक अचानक येतो का? शरीर याबाबत पूर्वसूचना देत नाही का? जर तुमच्याही मनात असा प्रश्न असेल तर चला जाणून घेऊया हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर कोणते संकेत देतं. यामध्ये हार्ट अटॅक येण्याच्या काही तास अगोदर कोणती लक्षणं दिसून येतात ते जाणून घेऊया.

हार्ट अटॅकपूर्वी शरीर देत असलेले संकेत

अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, हार्ट अटॅक येण्याच्या काही तासांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी शरीर चेतावणी संकेत देऊ शकतं.

  • छातीत अस्वस्थता, दडपण किंवा जडपणा

  • दुखणं इतर भागांमध्ये पसरणं. जसं की, हातात, पाठीवर, मान, जबड्यात किंवा दातांपर्यंत

  • श्वास घेण्यास त्रास

  • अचानक थंड घाम

  • मळमळ, चक्कर येणे

मेयो क्लिनिकच्या अहवालानुसार, हार्ट अटॅकचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दडपण किंवा जडपणा. हे दुखणं इतर भागांमध्ये पसरू शकतं आणि यासोबत थंड घाम, मळमळ, चक्कर यासारखी लक्षणं दिसू शकतात.

काही अहवालांमध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे की, हार्ट अटॅकपूर्वी अनेक रुग्णांना असामान्य थकवा जाणवतो. विशेषतः महिलांमध्ये कोणताही स्पष्ट कारण नसताना थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

हार्ट अटॅक का होतो?

हार्ट अटॅक होण्याचं मुख्य कारण म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी आर्टरीमध्ये अडथळा निर्माण होतो. हा अडथळा कोलेस्ट्रॉलच्या थरांमुळे, फॅटी डिपॉझिट्स आणि रक्ताच्या गाठींमुळे होऊ शकतो. रक्तप्रवाह थांबल्यामुळे हृदयाला ऑक्सिजन मिळत नाही आणि हार्ट अटॅक होतो.

बचावासाठी काय केलं पाहिजे?

  • नियमित आरोग्य तपासणी करावी

  • स्मोकिंग आणि मद्यपान टाळलं पाहिजे

  • संतुलित आहार आणि व्यायाम यांचा अवलंब करावा

  • तणाव कमी ठेवावा

  • कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रणात ठेवावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT