Diabetes Care Tips : मधुमेहाच्या रुग्णांना प्रत्येक ऋतूमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण राखण्यासाठी वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. हिवाळ्यात शारीरिक निष्क्रियतेमुळे साखरेची पातळी वाढू लागते, तर उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे साखरेची पातळी वाढू लागते. म्हणूनच उन्हाळ्यात आहारात काही बदल करणे खूप गरजेचे आहे.
उन्हाळ्याच्या हंगामात (Summer Season) मधुमेह असलेल्या लोकांमध्ये थकवा देखील अधिक सामान्य आहे, कारण पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंचे नुकसान होते आणि जास्त घाम येणे देखील बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढवते. त्यामुळे अशावेळी अधिक काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी या टिप्स (Tips) फॉलो करा
1. शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा
उष्णतेचा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी, सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा शारीरिक हालचाली वाढवा. दिवसाच्या सर्वात गरम वेळेत, विशेषतः सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत बाहेर पडणे टाळा. सक्रिय राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे ३० मिनिटे चालणे, एकतर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तापमान थंड असताना सक्रिय राहा.
2. फायबर-समृद्ध अन्न खा:
भरपूर धान्याचा आहारात समावेश करा, कारण ते पचन कमी करण्यास मदत करतात, रक्तातील साखर अचानक वाढण्यास प्रतिबंध करतात. उच्च फायबरचा आहार वजन कमी करण्यास प्रोत्साहन देतो, ज्यामुळे मधुमेहाचे (Diabetes) चांगले व्यवस्थापन होऊ शकते आणि हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि काही प्रकारचे कर्करोग (Cancer) होण्याचा धोका देखील कमी होऊ शकतो. म्हणून, उन्हाळ्यात ओट्स, ब्राऊन राइस, संपूर्ण धान्य ब्रेड आणि तृणधान्ये तसेच फळे, नट, बिया आणि गाजर, टोमॅटो आणि इतर तंतुमय भाज्या आणि फळे खा.
3. ज्यूस पिणे टाळा
उन्हाळ्यात ताजेतवाने होण्यासाठी अनेकांनाज्यूस आणि स्मूदी पिणे आवडते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की या पेयांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते आणि फायबरचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. तुम्हाला मधुमेह असल्यास, गोड रस पिणे टाळा किंवा ते कमी प्रमाणात पिणे चांगले. त्याऐवजी फळांचे सेवन करा.
4. हायड्रेटेड राहा:
उच्च रक्तातील साखरेची पातळी असलेल्या लोकांमध्ये उन्हाळ्यात लघवी जास्त होते आणि घामही येतो, ज्यामुळे त्यांच्यामध्ये पाण्याची कमतरता जास्त दिसून येते आणि पाण्याच्या कमतरतेमुळे साखर वाढते. मग शरीरातील अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी मूत्रपिंड अधिक मेहनत करू शकतात. अतिरिक्त ग्लुकोज काढून टाकण्यासाठी भरपूर पाणी प्या. भरपूर लिंबू पाणी प्या, याशिवाय तुम्ही ग्रीन टी, भाज्यांचा बनलेला ग्रीन ज्यूस प्या. दर दोन तासांनी साधे पाणी प्यावे.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.