Symptoms of Blood Cancer During Night Time saam tv
लाईफस्टाईल

Early symptoms of blood cancer: ब्लड कॅन्सरमध्ये रात्रीच्या वेळेस रूग्णांना शरीरात जाणवतात 'हे' बदल; दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं

Symptoms of Blood Cancer During Night Time: ब्लड कॅन्सर हा रक्तपेशींच्या असामान्य वाढीमुळे होतो, ज्यामुळे शरीरातील निरोगी पेशींचं उत्पादन बाधित होतं. याचा परिणाम शरीराच्या अनेक कार्यांवर होतो आणि काही लक्षणे रात्रीच्या वेळी अधिक तीव्रतेने जाणवू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

ब्लड कॅन्सर ही एक गंभीर आणि जीवघेणी आजार आहे. मात्र यापेक्षाही अधिक चिंतेची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये या आजाराचे प्रमाण प्रचंड वाढलंय. त्यामुळे ब्लड कॅन्सर आता दुर्मिळ आजार राहिलेला नाही. संपूर्ण जगभरात या आजाराच्या वाढत्या प्रकरणांनी आरोग्य संस्थेवर ताण येतोय.

२०२२ मध्ये ग्लोबोकॅन या संस्थेने एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. या रिपोर्टमध्ये भारतातील ब्लड कॅन्सरशी संबंधित धक्कादायक आकडेवारी समोर आली. या रिपोर्टनुसार, फक्त २०२२ मध्येच भारतात ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ७०,००० च्या पुढे गेली.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ब्लड कॅन्सरवर जर आपण वेळेच उपचार केले तर आणि तात्काळ उपचार सुरू झाले तर रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे आपल्या शरीरात कोणतेही बदल जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. विशेषतः जी काही गंभीर लक्षणं आहेत, त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ब्लड कॅन्सरची लक्षणं खासकरून रात्रीच्या वेळेस दिसून येतात. ही लक्षणं कोणती असतात ती जाणून घेऊया. जेणेकरून या गंभीर आजारावर उपचार करणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे.

सतत थकवा जाणवणं

ब्लड कॅन्सरचं एक प्राथमिक आणि सामान्य वाटणारं लक्षण म्हणजे सतत थकवा वाटणं. यामध्ये व्यक्तीला खूप आराम केल्यानंतरही झोप पूर्ण न झाल्यासारखं, ऊर्जा नसल्यासारखं वाटतं. हा थकवा काही वेळेस इतका असतो की अगदी दैनंदिन कामं करणंही कठीण होऊन जातं.

सतत इन्फेक्शन होणं

ब्लड कॅन्सरमुळे शरीराच्या इम्युनिटी सिस्टमवरही परिणाम होतो. यामध्ये शरीराची इम्युनिटी कमकुवत होते . त्यामुळे रुग्णाला वारंवार सर्दी, ताप, किंवा त्वचेचं इन्फेक्शनसारख्या समस्या होऊ लागतात.

सांधेदुखी आणि हाडांमध्ये वेदना

या आजारात काही रुग्णांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो. पायांमध्ये विशेषतः रात्रीच्या वेळी तीव्र वेदना होणं हेही एक लक्षण आहे. काही वेळा या वेदना खूप दिवस टिकतात आणि औषधं घेतली तरी कमी होत नाहीत.

रात्री झोपताना घाम येणं

ब्लड कॅन्सरपैकी लिम्फोमा या प्रकारात, रात्री झोपताना अचानक किंवा खूप घाम येण्याची तक्रार रुग्णांना जाणवते. हा घाम इतका असतो की रुग्णाला झोपेतून जाग येते. हे एक महत्त्वाचं आणि गंभीर लक्षण आहे. ज्याकडे दुर्लक्ष करणं कठीण होऊ शकतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींच्या करियरला कलाटणी मिळेल, वाचा राशीभविष्य

Comedian Actor Death: चित्रपटसृष्टीवर शोककळा, कॉमेडियन अभिनेत्याचं निधन

Maratha Reservation : कुणबी दाखले दिले, व्हॅलेडिटीचं काय? हैदराबाद GRवरून मराठा संघटनांमध्ये वाद? VIDEO

Shani Gochar: दसऱ्यानंतर 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस; शनीच्या नक्षत्र गोचरमुळे होणार मालामाल

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

SCROLL FOR NEXT