बिंगो रोलेटसह अन्य ऑनलाईन गेम्सचा तरूणाईला विळखा; व्यसनापायी 60 जणांचा बळी अभिजीत सोनवणे
लाईफस्टाईल

बिंगो रोलेटसह अन्य ऑनलाईन गेम्सचा तरूणाईला विळखा; व्यसनापायी 60 जणांचा बळी

आर्थिक आमिषापोटी तरुणाई या गेम्सच्या आहारी गेली आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक - बिंगो रोलेटसह अन्य ऑनलाईन गेम्सनं तरूणाईला विळखा घातला असून लॉकडाऊनच्या काळात या ऑनलाईन गेम्सचे व्यसन लागले आहे. केवळ बिंगो रोलेटच्या व्यसनापायी आत्तापर्यंत 60 जणांचा बळी गेल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता हे ऑनलाईन गेम्स कधी बंद होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बिंगो रोलेटसह अन्य ऑनलाईन गेम्स सध्या धुमाकूळ घातला असून आर्थिक आमिषापोटी तरुणाई या गेम्सच्या आहारी गेली आहे.

हे देखील पहा -

या ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून कोट्यावधींची उलाढाल होत असल्याने झटपट पैसे कमावण्याच्या नादात तरुणाई या ऑनलाईन गेम्सला बळी पडत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गेम्समध्ये लाखो रुपये गमावल्याने राज्यभरात 60 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे या ऑनलाईन गेम्सना शासनाची अधिकृत मान्यता नसली, तरी जुन्या कायद्यांच्या आधारे ठोस कारवाई करता येत नसल्याने ऑनलाईन गेम्सचा धंदा बिनभोभाट सुरु आहे.

बिंगो रोलेटशी संबंधित राज्यभरात 17 गुन्हे दाखल असून हे गेम्स चालवणाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल आहेत. मात्र जुने कायदे हे केवळ जुगारासंदर्भातील गुन्ह्यांसाठी असल्याने पोलीसी कारवाईला मर्यादा येतात. त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये कडक कारवाईसाठी दंड आणि शिक्षेत वाढ करण्याचा प्रस्ताव नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी पोलीस महासंचालकांना दिला आहे.

शिवाय अशा गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा अथवा मोक्काअंतर्गत कारवाईसाठी देखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. गेल्या काही वर्षांत ऑनलाईन गेम्सचा सुळसुळाट झाला असून कायद्यातील पळवाटांच्या आधारे ऑनलाईन गेम्स चालकांनी आपलं बस्तान बसवलं आहे. या गेम्सच्या माध्यमातून पैसे झटपट कमावण्याचे आमिष दाखवले जात असल्याने तरुणाई याला बळी पडत आहे. त्यामुळे अशा गेम्सवर कठोर बंधन लादण्याची गरज निर्माण झाली आहे. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test Score Live: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT