Ujaas EZy Saam Tv
लाईफस्टाईल

Ujaas EZy: नागपूरहून भंडारा एका चार्जमध्ये गाठणार, फक्त 31,880 रुपयात येते 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर

Ujaas EZy EV: नागपूरहून भंडारा एका चार्जमध्ये गाठणार, फक्त 31,880 रुपयात येते 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर

Satish Kengar

Ujaas EZy EV:

मिड सेगमेंटच्या ईव्ही स्कूटर्सना बाजारात खूप मागणी आहे. स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सना लोकांची पसंती वाढत आहे. या सेगमेंटमध्ये एक पॉवरफुल ईव्ही स्कूटर आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर सुमारे 60 किलोमीटर धावते, असा दावा कंपनीने केला आहे. यात मागील सीटवर बॅक रेस्टसह जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

1.25 वॅटचा बॅटरी पॅक

ही स्टायलिश दिसणारी EV स्कूटर 31,880 हजार रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. ही सध्या बाजारात एक प्रकारात आणि दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 6 ते 7 तासांत ही फुल चार्ज होते. यात 1.25 वॅटचा बॅटरी पॅक आहे. यात 250 मोटर पॉवर आहे. ही स्टायलिश स्कूटर आरामदायी सीट डिझाइनसह येते.

दोन्ही टायरवर ड्रम ब्रेक

रायडर्सच्या सुरक्षेसाठी Ujaas eZy च्या पुढील आणि मागील दोन्ही टायरवर ड्रम ब्रेक आहेत. यामध्ये ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. ही स्कूटर 25 किमी/ताशी टॉप स्पीड देते. यात आकर्षक अलॉय व्हील्स आहेत. ही न्यू जनरेशन स्कूटर आहे. (Latest Marathi News)

यातच Ujaas Energy eGo देखील बाजारात उपलब्ध आहे. ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 75 किमीची रेंज देते. ही 34880 हजार रुपयांमध्ये ग्राहक खरेदी करू शकता . ही स्कूटर 7 तासात फुल चार्ज होते. स्कूटरमध्ये 1.56 Kwh चा बॅटरी पॅक आहे. स्कूटरमध्ये 250 वॅटची मोटर आहे.

हिची स्पर्धा Velev Motors VEV शी होते. ही EV स्कूटर 32500 हजार रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 6 ते 8 तासात फुल चार्ज होते. याचा टॉप स्पीड 25 किमी/तास आहे. यात 15 Kwh चा बॅटरी पॅक आहे. ही शक्तिशाली स्कूटर एका चार्जमध्ये 80 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

SCROLL FOR NEXT