OTP API Scam Saam Tv
लाईफस्टाईल

OTP API Scam : सावधान! एकाच वेळी OTP चे अनेक मेसेज येताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं...

OTP Scam : हॅकर्स अनेकांचे खाते रिकामे करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबत आहेत. अशीच एक पद्धत समोर आली आहे ती OTP स्कॅमची.

कोमल दामुद्रे

Online Scam :

ऑनलाइन स्कॅम होणाऱ्या घटना वारंवार पाहायला मिळतात. भारतात ऑनलाइन स्कॅमिंग घटनांमध्ये सातत्याने वाढ होणार आहे. हॅकर्स अनेकांचे खाते रिकामे करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबत आहेत. अशीच एक पद्धत समोर आली आहे ती OTP स्कॅमची.

अनेकांचे खाते रिकामे करण्यासाठी हॅकर्सने ऑटोमेटेड सॉफ्टवेअर प्रोग्रॅम तयार केला आहे जो ओटीपी व्हेरिफिकेशनवर काम करतो. याद्वारे ओटीपी व्हेरिफिकेशन एपीआय वापरून लोकांना फसवले जाते.

1. OTP API काय आहे?

या अॅपवरुन वापरकर्त्यांच्या फोनवर (Smartphone) अनेक ओटीपी एकाच वेळी पाठवले जातात. जेव्हा एकाच वेळी अनेक मेसेज येतात त्यावेळी वापरकर्ते घाबरुन अनेक चुकीचे पाऊल उचलतात. अशावेळी येणाऱ्या ओटीपीवरुन लॉगिन करतात. यामुळे हॅकर्स (Hacks) या अॅपचा वापर करुन कोणत्याही नंबरवर हवे तितके एसएमएस पाठवू शकतो. यामध्ये कोणतीही मर्यादा नाही.

2. मेसेजच्या माध्यमातून स्कॅम (scam)

जेव्हा एकाच वेळी इतके मेसेज आल्यानंतर वापरकर्ता याकडे दुर्लक्ष करतात. त्याचाच गैरफायदा घेऊन हॅकर्स आपले खाते हॅक करते.

3. हॅकर्स फायदा कसा घेतात?

CloudSEK च्या सायबर थ्रेट संशोधनातून असे समोर आले आहे की, हॅकिंगच्या घोटाळ्यात अनेक मेसेज लपविण्याचा प्रयत्न केला जातो. जर एकाच वेळेस अनेक ओटीपी मेसेज एकत्र आल्याने बँक तुमचे खाते काही वेळेसाठी ब्लॉक करु शकते. असे झाल्यास हॅकर्स त्याचा फायदा घेऊ शकतात.

4. हॅकर्सना मोबाईल नंबर कुठून मिळतात?

हॅकर्स नंबर मिळवण्यासाठी अनेक प्रकारची मदत घेतात. एसएमएस बॉम्बरद्वारे अनेकांचे नंबर शोधून काढतात. तसेच हॅकर्स डार्क वेब आणि लिंक्डइनच्या माध्यमातूनही करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samir Choughule : समीर चौघुलेचा आनंद गगनात मावेना, कॉमेडी King 'या' पुरस्काराने सन्मानित, प्राजक्ता माळीने केलं खास कौतुक

Crime : महाराष्ट्राच्या लेकीची भोपाळमध्ये हत्या; प्रियकराने कुटुंबाच्या मदतीने रचला क्रूर कट; लोखंडी पेटीतून बाहेर आलं संतापजनक वास्तव

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ५८,८०० होणार

Liver Problems: लिव्हरला पूर्णपणे पोखरतात हेपेटाइटिस B आणि C; पाहा व्हायरस शरीरात गेल्यावर पहिल्यांदा काय बदल दिसतात?

SCROLL FOR NEXT