Nandurbar Tourism SAAM TV
लाईफस्टाईल

Nandurbar Tourism : पर्यटकांनो! वीकेंड खास करायचाय? तर नंदुरबारच्या 'या' ठिकाणांना आवर्जून द्या भेट

Nandurbar Travel News: महाराष्ट्रातील नंदुरबार हा जिल्हा निसर्गाने समृद्ध आहे. नंदुरबारमध्ये निसर्गसौंदर्यासोबतच अनेक धार्मिक स्थळे, हिल स्टेशन आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील या स्थळांना नक्की भेट द्या.

Shreya Maskar

आजकाल प्रत्येकजण धावपळीचे जीवन जगत असते. धावपळीच्या जीवनातून थोडा ब्रेक मिळावा असं प्रत्येकालाच वाटतं. त्यामुळे अनेकजण सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्याचा प्लान करतात. दोन दिवसाच्या सुट्टीत आपण जास्त लांब जाऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातीलच काही पर्यटनस्थळांना भेट द्या. यामध्ये तुम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना भेट देऊ शकता. नंदुरबार जिल्हा हा निसर्गाने समृद्ध आहे नंदुरबारमधील वेगवेगळ्या स्थळांना तुम्ही भेट देऊ शकतात.

नंदूरबार (Nandurbar) जिल्हा हिरवळ धबधबे, शांत नद्या,मंदिरे या सर्व गोष्टींसाठी प्रसिध्द आहे.पर्यटकांना नंदूरबार जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळांना भेट देता येईल. ज्या पर्यटकांना निसर्गाचं सौंदर्य आणि सांस्कृतीक वारसा जवळून पाहायचा असेल, त्यांच्यासाठी नंदूरबार एक उत्तम ठिकाण आहे. नंदूरबारला भेट देताना तुम्ही तिन्ही मार्गानीं प्रवास करु शकता. विमानाने तुम्ही सुरत विमानतळाजवळ जावून हवाई मार्गाने प्रवास करु शकता. नंदूरबार रेल्वे स्टेशन असल्याने तुम्ही मुंबई, अहमदाबादवरुन रेल्वे प्रवास करु शकता. नंदूरबारला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. जर तुम्ही पण नंदूरबारच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार असाल, तर तुमचा हा अविस्मरणीय प्रवास खूप अनुभवी ठरणार आहे. तुमचा हा प्रवास आनंददायी ठरण्यासाठी नंदूरबार जिल्ह्याला नक्की भेट द्या.

तोरणमाळ हिल स्टेशन

नंदूरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हिल स्टेशन एक नयनरम्य पर्यटन स्थळ आहे. निसर्गाच्या सनिध्यात असलेले हिल स्टेशन त्याच्या सुंदर वातावरणासाठी खूप प्रसिध्द आहे. निसर्गप्रेमी असणाऱ्या पर्यटकांसाठी तोरणमाळ एक उत्तम लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. तोरणमाळ समुद्रसपाटीपासून १४६१ मीटर उंचीवर आहे. या हिल स्टेशनचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही ट्रेकिंग,कॅम्पिंग, आणि बोटिंग करु शकता.

दक्षिण काशी मंदिर

महाराष्ट्रातील दक्षिण काशी मंदिर एक प्राचीन मंदिर आणि पूजनीय मंदिर आहे. या मंदिराला महाराष्ट्राचे वाराणसी म्हणून ओळखतात. दक्षिण काशी मंदिर बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असून, भगवान शंकराला समर्पित आहे. या काशी मंदिरात पर्यटकांना सांस्कृतिक वारशाचे कोरीवकाम आणि मंदिराची वास्तुकला पाहायला मिळेल. मंदिराला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. दक्षिण काशी मंदिर नर्मदा नदीच्या काठावर असून अनेक पर्यटकाचं आकर्षण ठरलं आहे.

निनाई धबधबा

नंदूरबार जिल्ह्यातील निनाई धबधबा सर्वच पर्यटकांना त्याच्या मनमोहक दृश्यामुळे आकर्षित करत आहे. सुट्टीचा पुरेपुर आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या धबधब्याला भेट देण्यासाठी पिकनिक स्पॅार्ट म्हणून येतात. मनाची शांतता आणि घनदाट जंगलात असणारा निनाई धबधबा सर्वाचं आकर्षण ठरला आहे. तुम्हाला या धबधब्याला भेट देताना ट्रेकिंग करुन जावे लागेल.

नारायणपूर

महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यात नारायणपूर एक छोटेसे गाव आहे. नारायणपूर हे गाव तापी नदीच्या काठावर वसलेले आहे. हिरवेगार डोंगर, जंगल असलेले नारायणपूर गाव अनेक पर्यटकाचं आदर्श ठरलं आहे. नंदूरबारमधील नारायणपूर प्रसिद्ध नरसिंह मंदिर असून,विविध प्राचीन मंदिराचे घर म्हणून मानतात. नारायणपूरचा सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी अनेक पर्यटकाचं एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

दंडपाणेश्वर गणेश मंदिर

नंदूरबार जिल्ह्यत दंडपाणेश्वर गणेश मंदिर आहे. दंडपाणेश्वर गणेश मंदिरला अडथळे दूर करण्यासाठी आणि यश मिळण्यासाठी मानतात. निसर्ग सौंदर्याने असलेले दंडपाणेश्वर मंदिर भगवान गणेशाला समर्पित आहे. अनेक पर्यटकांसाठी हे मंदिर एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.

नंदूरबारला जाण्यासाठी तुम्ही बसने ही प्रवास करु शकता. ५६ राष्ट्रीय महामार्ग असल्याने तुम्ही पुणे, मुंबई, सुरत यांसारख्या कोणत्या ही मार्गावरुन प्रवास करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का?  'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

SCROLL FOR NEXT