Kurla Travel SAAM TV
लाईफस्टाईल

Kurla Travel : मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात फिरायला वेळ नाही; मग कुर्ल्यातील 'या' ठिकाणी नक्की जा, पुढच्या वीकेंडपर्यंत रहाल फ्रेश

Best Places In Kurla : रोजचं काम करून थकवा आला असेल आणि तुम्हाला नवीन काहीतरी पाहायचे असल्यास कुर्ल्यातील 'या' ठिकाणांना आवर्जून भेट द्या आणि कुटुंबासोबत मजा मस्ती करा.

Shreya Maskar

आपण प्रत्येकजण वीकेंडची वाट पाहत असतो. रोजच्या कामाच्या व्यापातून एक दिवस आराम आणि मूड फ्रेश करण्यासाठी प्रत्येकाला हवा असतो. या दिवशी आपली आवडती कामे करून संपूर्ण दिवस आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत घालवला जातो.

तुम्हाला फिरण्याची आवड असल्यास सुट्टीत कुठे तरी जवळ फिरायचे असल्यास कुर्लाला आवर्जून भेट द्या आणि तेथील या सुंदर ठिकाणांना भेट द्या. तुमची सुट्टी नक्कीच आनंदात जाईल. कुर्ला हे ठिकाण भारतातील पूर्व मुंबईचे उपनगर आहे. तुम्ही मध्य रेल्वेने कुर्ला ( Kurla ) स्टेशनला उतरा आणि या मनोरंजक ठिकाणांना भेट द्या.

स्नो वर्ल्ड

स्नो वर्ल्ड हे स्नोवर आधारित थीम पार्क आहे. तुम्ही येथे तुमच्या मुलांसोबत आणि कुटुंबांसोबत धमाल मस्ती करू शकता. येथे लहान मुलांतचे छान मनोरंजन होते. थंड वातावरणात बर्फात खेळताना खूप मजा येते. फिनिक्स मार्केटसिटी कुर्ला येथील स्नो वर्ल्ड मुंबईतील सर्वात बेस्ट स्नो वर्ल्डचे ठिकाण आहे. येथे तुम्ही अनेक साहसी उपक्रम करू शकता. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ विरंगुळा करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथे गेल्यावर तुम्हाला पुन्हा लहान होता येते.

जिओ वर्ल्ड सेंटर

जिओ वर्ल्ड सेंटर हे मुंबईतील व्यवसायिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. येथे अनेक कार्यक्रमाचे नियोजन होते. भारतातील अनेक मोठे सेलिब्रिटी, बिझनेसमॅन येथे पाहायला मिळतात. जिओ वर्ल्ड सेंटरची रचना आणि डिझाइन डोळ्यांचे पारणे फेडणार आहे.

मुंबई/बॉम्बे एक्झिबिशन सेंटर

मुंबई एक्झिबिशन सेंटर 1991 मध्ये बनवण्यात आले. हे भारतातील सर्वात मोठे एक्झिबिशन सेंटर आहे. गोरेगावच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे येथे बॉम्बे एक्झिबिशन सेंटर आहे. कुर्ल्यातून हे जवळ आहे. येथे मोठी प्रदर्शने आणि मेळ्यांचे आयोजन करण्यात येते.

राजमाता अहिल्याबाई होळकर गार्डन

कुर्ल्यात पश्चिमेला राजमाता अहिल्याबाई होळकर गार्डन आहे. हे मुंबईतील सर्वात आकर्षक ठिकाण आहे. उद्यानाच्या निसर्गरम्य पायवाटेवरून फेरफटका मारताना मनः शांती मिळते. येथे सर्वत्र हिरवळ पाहायला मिळते. तसेच रंगीबेरंगी फुलांनी बाग सजलेली आहे. येथे तुम्ही प्रियजनांसोबत वन डे पिकनिक प्लान करू शकता.

फिनिक्स मार्केटसिटी

फिनिक्स मार्केटसिटी ही कुर्ला येथे आहे. येथे देशी आणि विदेशी ब्रँड्सचे अनेक स्टोअर्स पाहायला मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanda Poha Recipe: मऊ आणि मोकळे कांदा पोहे बनवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Somatic Yoga Benefits: पाठदुखी आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय; घरच्या घरी करा सोमॅटिक योगा, ही आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT