Smartphone Under 10000 Saam Tv
लाईफस्टाईल

Smartphone Under 10K: कॅमेरा, बॅटरी आणि डिस्प्लेही जबरदस्त; 10 हजारपेक्षा कमी किंमत येतात 'हे' स्मार्टफोन

Smartphone News: कॅमेरा, बॅटरी आणि डिस्प्लेही जबरदस्त; 10 हजारपेक्षा कमी किंमत येतात 'हे' स्मार्टफोन

Satish Kengar

Smartphone Under 10000:

स्मार्टफोन मार्केटमध्ये जवळपास रोज एकामागून एक नवीन फोन लॉन्च होत आहेत. अशा परिस्थितीत स्वतःसाठी योग्य फोन निवडणे सोपे नाही. Realme, Xiaomi आणि Poco सारख्या ब्रँडद्वारे बजेट सेगमेंटमध्ये अनेक पर्याय ऑफर केले जात आहेत. अशातच आम्ही तुम्हाला 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या टॉप स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ कोणते आहेत हे स्मार्टफोन...

Redmi 9

Xiaomi Redmi ब्रँडिंग असलेल्या या डिव्हाइसमध्ये 60Hz IPS LCD डिस्प्ले आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर 2.3GHz MediaTek Helio G35 प्रोसेसर आहे. Redmi 9 मध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा आहे. याची किंमत 9,499 रुपये आहे.

Realme Narzo N53

या Realme स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये झाली आहे आणि यात 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. यात 50MP क्षमतेचा प्रायमरी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा सेन्सरसह Unisoc T612 प्रोसेसर आहे.  (Latest Marathi News)

Poco C55

Poco चा स्मार्टफोन Amazon वरून 8,443 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनच्या मागील पॅनलवर 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हे MediaTek Helio G85 प्रोसेसरसह परफॉर्मन्स मिळवते. याशिवाय HD+ रिझोल्यूशनसह 6.71 इंच डिस्प्ले उपलब्ध आहे.

Realme C33

ग्राहक 8,936 रुपयांच्या किमतीत Realme डिव्हाइस खरेदी करू शकतात. कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा आहे. Unisoc T612 प्रोसेसर व्यतिरिक्त, यात 6.2 इंच 60Hz डिस्प्ले आणि 10W चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: हिवाळ्यात भाजलेले हरभरे खा; 'हे' आजार राहतील कोसो दूर

International Men's Day 2024: सावधान; 'या' आजारचे पुरुष ठरू शकतात बळी...

Mathira Viral Video: टिकटॉक स्टार इम्शा रहमानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS लीक; व्हिडीओ होतोय व्हायरल

Maval Vidhan Sabha : मावळचा गड यंदा कोणाकडे?; महायुतीतील राष्ट्रवादीसोबत अपक्षांची झुंज, आघाडीही अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी

Delhi Pollution: प्रदुषणामुळे दिल्लीत श्वास घेणंही कठीण ! AQI 500 पार, शाळा-महाविद्यालये ऑनलाईन, रेल्वे-विमानसेवा विस्कळीत 

SCROLL FOR NEXT