सध्या Flipkart आणि Amazon च्या शॉपिंगवर सेल सुरु आहे. सणासुदीच्या काळात बिग बिलियन डेज सेल आणि ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान अनेक उत्पादनांवर सवलत मिळत आहे.
जर तुम्हालाही काही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायच्या असतील तर चांगला ऑप्शन आहे. अशातच तुम्ही तुमच्या घरासाठी Smart TV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला बेस्ट पर्याय सांगणार आहोत.
जर तुम्हाला 43 इंच स्क्रीन आकाराचा टीव्ही घ्यायचा असेल तर 25 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतील. त्यांच्या यादीत OnePlus, Xiaomi आणि Redmi च्या स्मार्ट टीव्हीचा ऑप्शन येथे आहे.
1. OnePlus 43 Y1S Pro
OnePlus चा हा प्रीमियम स्मार्ट टीव्ही Rs 39, 999 च्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता पण तो Amazon सेलमध्ये Rs 24,999 मध्ये उपलब्ध आहे. बँक ऑफर्ससह या टीव्हीवर अतिरिक्त सवलतींचा लाभ घेता येईल. बेझल-लेस डिझाइनशिवाय, या स्मार्ट टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा एचडी रिझोल्यूशन आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह शक्तिशाली स्पीकर आहेत. हा टीव्ही अनेक OTT अॅप्स आणि स्क्रीनकास्टिंगला सपोर्ट करतो.
2. Xiaomi 43
Amazon वर 42,999 रुपयांच्या लॉन्च किमतीच्या (Price) तुलनेत 22,990 रुपयांना मिळत आहे. यामध्ये क्वाल-कोर A55 प्रोसेसर आहे. रेडमी 43-इंच फायर टीव्ही एफ-सीरीजही मिळते आहे. रेडमी फायर टीव्ही विक्रीमुळे 20,999 रुपयांना Amazon वर सूचीबद्ध आहे आणि त्यावर 51% सूट मिळत आहे. यामध्ये आपल्याला डॉल्बी अॅटमॉस, ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी व्यतिरिक्त, यात 3.5 मिमी हेडफोन जॅकस मिळत आहे. यामध्ये HDR10 सपोर्टसह 4k अल्ट्रा एचडी रिझोल्यूशनसह डिस्प्ले मिळत आहे.
3. Hisense E7K Smart VIDAA TV
Flipkart सेलमध्ये या टीव्हीची मूळ किमत Rs 46,999 आहे तर ऑफर्समध्ये आपण हा टीव्ही Rs 24,999 मध्ये खरेदी करू शकतात. या टीव्हीमध्ये अनेक OTT अॅप्स आहेत आणि ते VIDAA ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. या टीव्हीमध्ये 24W ड्युअल स्पीकर सेटअप आहे. या टीव्हीमध्ये QLED डिस्प्ले देखील मिळत आहे, जे 4K टेकपेक्षा चांगले मानले जाते.
4. Kodak CA Pro Android TV
Kodak Smart TV ची लॉन्च किंमत 39,999 रुपये ठेवण्यात आली होती परंतु Flipkart च्या सेलमध्ये हा स्मार्ट टीव्ही 23,999 रुपयांना मिळत आहे. तसेच यामध्ये अनेक बँक ऑफर्सही मिळत आहे. यामध्ये अँड्रॉइड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टीमसह, यात गुगल असिस्टंट आणि बिल्ट-इन क्रोमकास्ट सपोर्ट देखील आहे. हा टीव्ही अल्ट्रा HD (4K) रिझोल्यूशन आणि 40W चा स्पीकर सेटअप देतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.