Benefits of papaya, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

औषधी गुणांनी समृध्द अशी पपई !

अनेक आजारांवर पपई फायदेशीर कशी ठरते ते जाणून घ्या.

कोमल दामुद्रे

मुंबई : पपई फक्त फळच नाही तर त्याचे आरोग्याला देखील अनेक फायदे होतात. पपईच्या कच्च्या फळापासून भाजी, रायता व लोणचे बनवले जाते.

हे देखील पहा -

पपईचे सेवन केल्याने इम्यूटिनीटी वाढण्यास मदत होते. पपईत फायबर देखील आढळून येते. यामध्ये जीवनसत्त्व क व ए अधिक प्रमाणात असते. वाढलेल्या वजन कमी करण्यासाठी पपईचे सेवन फायदेशीर ठरु शकते. पिकलेल्या पपईचा गर दूध साखरेच्या मिश्रणात किंवा लिंबाचा रसात मिसळून च्याचे सरबत उन्हाळ्यात प्यायल्याने फायदा होतो. नियमितपणे पपईचे सेवन अनोशीपोटी केल्यास त्वचेचे सौंदर्य वाढते. पपईचा गर दररोज चेहऱ्यावर लावल्याने मुरुमे, सुरकुत्या नाहीशा होतात. पपईचा फायदा कसा होतो हे जाणून घेऊया.

१. डाग, खाज यांसारख्या त्वचेशी संबंधित आजारांमध्ये कच्च्या पपईचा ताजा रस काही दिवस नियमित लावल्याने फायदा होईल.

२. रक्ताल्तपतेमुळे अनेक मातांना दुधांची कमतरता जाणवते. अशा महिलांनी सलग १० ते १५ दिवस पिकलेल्या पपईचे सेवन करावे. याने दूध वाढू शकते व रक्ताची (Blood) कमतरता दूर होईल.

३. यकृताशी संबंधित आजार, कावीळ, वात यांसारख्या विकारात पपईचा रस ५ ते १० थेंब घ्या. यात बताशा मिसळून यांचे सेवन केल्यास फायदा (benefits) होऊ शकतो.

४. पोटामध्ये जंत झाल्यास किंवा सतत अजीर्णाचा त्रास होत असल्यास कच्च्या पपईचा रस प्यायल्याने या समस्येवर मात करता येऊ शकतो.

५. पपईचे सेवन केल्यास शरीरात बळ वाढण्यास मदत होते. पपई अनेक आजारांवर गुणकारी आहे. पचनास हलकी असून त्यात पोषक तत्वाचा समावेश आहे. तसेच पपईमध्ये असलेल्या फायबरमुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.

६. मधुमेहांच्या रुग्णांसाठी पपई अधिक फायदेशीर ठरते. पपईत असणाऱ्या घटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Colon Cancer: तोंडात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; आतड्यांच्या कॅन्सरशी असू शकतो संबंध

Maharashtra Live News Update : दहावी-बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत

Fire Accident : अग्निकांड! कार चार्जिंगवेळी शॉर्ट सर्किट, ४ सिलिंडरचा स्फोट, ७ जणांच मृत्यू

Gudi Padawa 2026: मराठी नववर्षाची सुरुवात; गुढी किती वाजता उभारायची? शूभ मुहूर्त काय? पंचांगकर्ते दातेंनी दिली सर्व माहिती

Heart Disease Risk: कोलेस्ट्रॉल रिपोर्ट नॉर्मल, तरीही हार्ट अटॅकचा धोका? डॉक्टरांनी सांगितला हा दुर्लक्षित घटक ठरतोय विलन

SCROLL FOR NEXT