Benefits of neem leaves and bark
Benefits of neem leaves and bark  Saam Tv
लाईफस्टाईल

Benefits Of Neem Leaves and Bark : कडुलिंबाच्या पानाबरोबर सालही आहे फायदेशीर, त्वचेच्या व आरोग्याच्या अनेक समस्येवर गुणकारी

कोमल दामुद्रे

Benefits of neem leaves and bark : कडुलिंबाचा वापर साधरणत: घराला तोरण बांधताना सणाच्या दिवशी केला जातो. अनेक जण कडुलिंब चाऊन खातात, तर काही जण त्याच्या काड्यांनी दात साफ करतात. याची चव जरी कडू असली तरी त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

हे देखील पहा -

आयुर्वेदात कडुलिंबाला अधिक महत्त्व आहे. यांच्यात असणाऱ्या अँटी-बॅक्टेरियल व अँटी- फंगल या गुणधर्मांचा सगळ्यात चांगला स्त्रोत यात आहे. बरेच जण त्याच्या पानांचा वापर हा आरोग्यासाठी (Health) अधिक होतो तर त्याच्या सालीची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावता येते. रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. रक्ताच्या समस्येपासून त्रस्त असणाऱ्या लोकांनी आपल्या दिवसाची सुरुवात कडुलिंबाच्या पानांनी केल्यास फायदा होऊ शकतो. तसेच अॅनिमियाच्या समस्येपासून सुटका होते.

त्वचेची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा आपल्याला खूप उपयोग होऊ शकतो. त्वचेच्या अनेक समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला त्याच्या पानांचे सेवन करायला हवे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण रिकाम्या पोटी याचे सेवन करायला हवे. परंतु, कडुलिंबाच्या पानासोबत आपल्याला त्याचा सालीचाही उपयोग आहेत. त्वचेच्या अनेक विकारांसाठी आपण याच्या सालाचा उपयोग करु शकतो. कडुलिंबाच्या पानाप्रमाणे कडुलिंबाच्या सालीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-सेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक देखील असतात. याशिवाय कडुलिंबाच्या सालीत जीवनसत्त्व 'क' ही मुबलक प्रमाणात आढळते.

कडुलिंबाच्या सालीमध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल घटक त्वचेवरील मुरुमे व डाग घालवण्यास मदत करतात. यासाठी कडुलिंबाच्या सालीची पेस्ट करुन घ्यावी व ती चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स व डाग नाहीसे होण्यास मदत होईल.

त्वचेला (Skin) खाज किंवा त्वचा तरुण व तजेलदार ठेवण्यासाठी कडुलिंबाच्या सालीचा वापर करुन सुरकुत्या व बारीक रेषा घालवण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT