Benefits of Dark Chocolate Saam TV
लाईफस्टाईल

Dark Chocolate : तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण डार्क चॉकलेट खाल्ल्याने होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे

Dark Chocolate Effect : डार्क चॉकलेट हे तरूण मुला मुलींसाठी एक आवडीचे खाद्य झाले आहे. तर बरीच मंडळी आपल्या दैनंदिन दिनचर्येत डार्क चॉकलेटचा समावेश करतात. डार्क चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे आहेत.

Saam Tv

डार्क चॉकलेट हे तरूण मुला मुलींसाठी एक आवडीचे खाद्य झाले आहे. तर बरीच मंडळी आपल्या दैनंदिन दिनचर्येत डार्क चॉकलेटचा समावेश करतात. डार्क चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे आहेत, विशेषतः जर ते 70% किंवा अधिक कोकोसह असेल. त्याचे सेवन योग्य प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. डार्क चॉकलेटमध्ये फ्लॅवोनॉयड्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याचसोबत रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास डार्क चॉकलेट मदत करतं.

डार्क चॉकलेट अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढा देतात आणि पेशींचे नुकसान कमी करतात. डार्क चॉकलेटमध्ये असलेल्या संयुगांमुळे रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे मेंदूला चांगले पोषण मिळते. डार्क चॉकलेट स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. याशिवाय वजन कमी करणाऱ्यांसाठी ते धोक्याचे आहे का? किंवा डार्क चॉकलेट किती प्रमाणात सेवन करावं हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो त्याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

तज्ज्ञांच्या मते, दररोज डार्क चॉकलेट कमी प्रमाणात खाल्ले तर, ते आरोग्यदायी असू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. विशेषतः फ्लेव्होनॉइड्स, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास, जळजळ कमी करण्यास आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात. डार्क चॉकलेटमध्ये सेरोटोनिन आणि एन्डोर्फिनचे स्तर वाढवणारे घटक असतात, जे तणाव कमी करून मूड सुधारण्यास मदत करतात.

त्यासाठी उच्च कोको (७० टक्के किंवा त्याहून अधिक) असलेले डार्क चॉकलेट खाणे महत्त्वाचे आहे, असे बेंगळुरूतील अॅस्टर व्हाइटफील्ड हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन सल्लागार डॉ. एस. एम. फयाझ यांनी सांगितले. त्यांच्या मते, डार्क चॉकलेटचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ते खराब कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करते, त्याचप्रमाणे हृदयविकाराचा धोका कमी करते. याव्यतिरिक्त, मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

मात्र, त्याचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त केल्यास धोका निर्माण होऊ शकतो. वजन वाढू शकते. यामुळे काही व्यक्तींमध्ये बद्धकोष्ठतासारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात, असेही डॉ. फयाज म्हणाले. ते पुढे म्हणाले की, डार्क चॉकलेटमध्ये कॅफिन असते, जे जास्त सेवन केल्यास झोपेचा त्रास आणि अस्वस्थता येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, दररोज ३०-६० ग्रॅम डार्क चॉकलेट खाणे लाभदायक आहे.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT