Benefits Of Butter Milk Saam TV
लाईफस्टाईल

Benefits Of Butter Milk : पचनशक्ती बरोबरच ताकाचे आहेत अनेक फायदे, त्वचा व केसांसाठी तर बहुगुणी !

दह्यापासून तयार केलेले हे पेय अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते ज्यामुळे तुमचे केस आणि त्वचा निरोगी आणि सुंदर होईल.

कोमल दामुद्रे

Benefits Of Butter Milk : ताक हे आरोग्यासाठी अमृतच मानले जाते. त्याचा गुणधर्माबद्दल बोलायचे झाले तर कमीच आहे. ताक हे शरीरासाठी बहुगुणी असून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

ताकापासून वेगवेगळे पदार्थ देखील बनवले जातात. दह्यापासून बनवल्या जाणाऱ्या या पेयांचे शरीरास अधिक फायदे आहेत. ताक कार्बोहायड्रेट्सचा समृद्ध स्रोत आहे. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. याव्यतिरिक्त, त्यात चांगले बॅक्टेरिया देखील भरपूर असतात. तसेच प्रथिने, पोटॅशियम, फॉस्फरस, लॅक्टिक ऍसिड आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

ताकाचा जितका शरीरासाठी फायदा होतो तितकाच त्वचा व केसांसाठी देखील होतो. दह्यापासून तयार केलेले हे पेय अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते ज्यामुळे तुमचे केस आणि त्वचा निरोगी आणि सुंदर होईल. आणि यासाठी तुम्हाला ते पिण्याची गरज नाही, परंतु ते लावण्याची गरज आहे. जाणून घेऊया त्याचा वापर कसा करायला हवा.

१. चमकदार त्वचेसाठी

Glowing skin

ताक असणारे गुणधर्म हे त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे. हे मॉइश्चरायझर म्हणून त्वचेला हायड्रेट ठेवते. त्वचेची गेलेली चमक पुन्हा आणायची असेल तर त्यासाठी आपण त्याचा फेस पॅक म्हणून वापर करु शकतो. बेसन आणि काकडीच्या रसात ताक मिसळून पेस्ट तयार करा. त्यात चिमूटभर हळद घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर पंधरा मिनिटे ठेवा आणि नंतर चेहरा धुवा.

२. मुरुमांची समस्या

Pimples

आपल्या चेहऱ्यावर सतत मुरुमे येतात ज्यामुळे तरुण वयातील मुली अधिकच त्रस्त असतात. ताकामध्ये दह्यासारखे प्रोबायोटिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेवरील बॅक्टेरियाची वाढ मर्यादित करण्यासोबत चांगले बॅक्टेरिया वाढवते. चेहऱ्यावर ताक लावल्याने बंद छिद्रे उघडतात. त्वचेच्या पेशींच्या वाढीचा वेगही वाढतो आणि त्वचा मुक्तपणे श्वास घेते, ज्यामुळे मुरुम कमी होतात.

३. वृध्दपणा

Age

हे पेय अँटिऑक्सिडंट्सने भरलेले आहे, जे फ्री रॅडिकल्सची वाढ कमी करते. त्याचे मॉइश्चरायझिंग गुणधर्म कोरड्या त्वचेचे पुनरुज्जीवन करतात. ओटमीलसह ताक लावल्याने त्वचा घट्ट होण्यास मदत होते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात. यामुळे चेहऱ्याला तरुणपणा येतो.

४. सनटॅन कमी करा

sun tan removal

उन्हात गेल्यावर टॅनिंग होत असेल तर ते काढून टाकण्याची चिंता आता ताकावर सोडा. कोरफड सोबत ताक मिसळल्याने त्वचेवरील मृतपेशी काढून टाकण्यास मदत करते आणि खोलवर पोषण करते. ताकातील लॅक्टिक अॅसिड आणि अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट करतात. हे त्वचेच्या (Skin) मृत पेशी काढून टाकून त्वचा उजळ करते, त्यामुळे टॅनिंगचा प्रभाव नाहीसा होतो.

५. केसांची वाढ -

Hair Growth

केसांच्या (Hair) वाढीसाठी ताक, बेसन आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करून मास्क तयार करा. या मास्कने टाळूला मसाज करा. काहीवेळा केसांना शॅम्पू लावून स्वच्छ धुवा. प्रथिने गुणधर्मांनी समृद्ध असलेले ताक केस आणि टाळूला हायड्रेट करते. हे सर्व मिळून केस मजबूत होतील आणि केस लवकर वाढतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT