benefits of banyan tree in Marathi, vat purnima 2022, banyan tree health benefits ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

सात प्रदक्षिणा घालणाऱ्या वडाच्या झाडाचे फायदे जाणून घ्या

ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वडाच्या झाडाला आयुर्वेदात व धार्मिक कार्यात अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंदू धर्मात प्रत्येक सणाला (Festival) महत्त्व असते त्यापैकी एक वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. (Vat Purnima 2022)

हे देखील पहा-

वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी खास असतो तर महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वटवृक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीन देव वास करतात. या झाडाची प्रदक्षिणा केल्यास एकाच वेळी तिन्ही देवांची कृपा होते. या दिवशी वडाच्या झाडाला प्रदिक्षणा घालून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. शास्त्रात वटवृक्षाला मंगळाचा कारक मानले गेले आहे. आपल्या कुंडलीत मंगळ दोष असल्यास वटवृक्षाभोवती प्रदक्षिणा घालाव्या. १०० वर्ष जगण्याचे वरदान लाभलेल्या वडाला आपण फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी पुजतो. पण त्याचे आपल्या कसे फायदे होतात हे जाणून घेऊया. (Benefits of banyan tree in Marathi)

वटवृक्षाच्या झाडाचे फायदे -

१. वडाचे झाड हे २० तास ऑक्सिजन देते त्याला नियमित प्रदिक्षणा घातल्यास आपले आरोग्य सुधारते.

२. वडाच्या झाडाचा चिक हा दातदुखी, संधीवात व तळपायांच्या भेगांवर फायदेशीर ठरतो.

३. वडाच्या सालीचा काढा हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. याचे सेवन केल्यास फायदा होतो.

४. सांधेदुखी किंवा पाय मुरगळल्यावर वडाची पाने गरम करुन दुखऱ्या जागी लावल्यास आराम मिळतो.

५. तसेच पावसाळ्यात खाज किंवा पायाला चिखल्या झाल्या असतील तर वडाचे चिक लावावे.

६. वडाच्या पारंब्यांच्या रसाचे सेवन केल्यास ताप नाहीसा होण्यास मदत होते.

७. अतिसार झाल्यास किंवा पोटदुखत असल्यास कोवळ्या पारंब्याचा रस प्यायल्याने आराम मिळतो.

८. वडाच्या पारंब्या खोबऱ्याच्या तेलात (Oil) भिजवून केसांना हे तेल लावल्यास केस गळती थांबते व केस दाट होण्यास मदत होते.

९. वडाच्या पानांपासून जेवणासाठी पत्रावळी देखील बनवली जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

First Metro: जगातील पहिली मेट्रो कधी आणि कुठे सुरू झाली? जाणून घ्या रंजक इतिहास

जुना वाद जिवावर उठला! ५ जणांनी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टेम्पो घातला; रस्त्यावर चिरडून मारलं

SCROLL FOR NEXT