Bendewadi Waterfall Saam TV
लाईफस्टाईल

Bendewadi Waterfall : निसर्गाचं सौंदर्य पाहून डोळे दिपतील; मावळमधील कुणीही न पाहिलेला हिडन धबधबा, एकदा भेट तर द्या...

Waterfall In Maval : तुम्ही देखील आतापर्यंत विविध प्रसिद्ध धबधब्यांना भेट देऊन झाली असेल आणि आता कुठे जावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास आणि हिडन धबधबे शोधले आहेत.

Ruchika Jadhav

पावसाळा सुरू असून प्रत्येक जण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाहेर फिरण्याचा प्लान करत आहेत. बाहेर फिरण्यासाठी मुंबई आणि पुण्यातील सर्वच पर्यटक विविध धबधब्यांना भेट देतात. अशात तरुण मंडळी तर नेहमीच अशा ठिकाणी फिरण्यासाठी जातात. आता तुम्ही देखील आतापर्यंत विविध प्रसिद्ध धबधब्यांना भेट देऊन झाली असेल आणि आता कुठे जावे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास आणि हिडन धबधबे शोधले आहेत.

बेंदेवाडी धबधबा

बेंदेवाडी धबधबा बेंदेवाडी या गावातच आहे. पुण्यातील मावळ तालुक्यात बेंदेवाडी गाव आहे. या गावात काही अंतर चालून गेल्यानंतर हा सुंदर धबधबा लागतो. निळेभोर आणि सफेद फेसाळणारे पाणी यात पाहायला मिळते. पुण्यातील अनेक पर्यटक येथे येत असतात. तुम्ही देखील या धबधब्याला भेट देऊ शकता.

कसे जायचे?

या धबधब्याला भेट देण्यासाठी सर्वात जवळ कान्हे रेल्वे स्थानक आहे. मुंबई, पुणे, लोणावळा या लोकल ट्रेनमधून देखील तुम्ही कान्हे स्थानकावर थांबू शकता. कान्हे स्टेशनवरून पुढे तुम्ही खांडीकडे जाणारी बस पकडू शकता. त्यानंतर 15 किमी अंतरावर जगताप धबधबा आहे. तसेच त्यापुढे बेंदेवाडी आणि लालवाडी धबधबा देखील आहे.

या धबधब्यावर फिरण्यासाठी तुम्ही तुमचे एखादे खासगी वाहन घेऊन आलात तर तुम्हाला येथील परिसर आणखी छान फिरता येईल. तसेच येथील विविध ठिकाणी भेट देता येईल.

भाजे धबधबा

लोणावळा येथे देखील काही हिडन धबधबे आहेत. त्यातीलच एक भाजे धबधबा. या धबधब्याला भेट देण्यासाठी तुम्हाला लोणावळा स्थानकात यावे लागेल. त्यानंतर पुढे तुम्हाला धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी खासगी वाहने मिळतील. त्यामार्फत तुम्ही भाजे धबधबा गाठू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs UAE : भारत दुबईत यूएईला भिडणार, हवामान अन् खेळपट्टीचा फायदा कोणाला होणार? वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update : ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर, तर शिदेंचा वरळी डोममध्ये?

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात श्राद्धाला कावळा शिवला नाही तर काय करावे?

Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT