Beer Made From Human Urine saam tv
लाईफस्टाईल

Human Urine Beer: माणसाच्या लघवीपासून बनवली जाते बिअर! विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे

Human Urine Use For Beer: बिअरमध्ये काही कंपन्या मानवी मूत्र वापरले जाते असे तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे. काही कंपन्या बिअरमध्ये माणसाची लघवी वापरतात.

Chandrakant Jagtap

Beer Made From Human Urine: उन्हाळ्यात बिअर पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. परंतु बिअर पीत असताना तुम्ही कधी विचार केलाय का की बिअर कशी बनवली जाते? बहुतेक बिअर बनवणाऱ्या कंपन्या गहू, बार्ली किंवा इतर भरड धान्य, फळे इत्यादी आंबवण्याच्या प्रक्रियेद्वारे बियर तयार करतात.

पंरतु बिअरमध्ये काही कंपन्या मानवी मूत्र वापरले जाते असे तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे. काही कंपन्या बिअरमध्ये माणसाची लघवी वापरतात. हे ऐकून तुम्हाला नक्कीच थोडं विचित्र वाटेल. पण हे गोष्ट खरं आहे. बिअरसाठी लघवीचा वापर कोणत्या कंपन्या करतात हे जाणून घेऊया.

सन 2017 मध्ये नोरेब्रो ब्रायघस या डॅनिश कंपनीने आपले नवीन बिअर उत्पादन तयार करण्यासाठी मानवी मूत्र वापरले. मात्र ही बाब उघडकीस आल्यावर अनेक कंपन्यांनी आपल्या मार्केटिंगमध्ये या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतला आणि ही बिअर अत्यंत वाईट आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला. कोणी मानवी मूत्र कसे वापरू शकतो? असा प्रश्न अनेकांना उपस्थित केला.

लघवीपासून कशी बनवली जाते बियर?

यानंतर Nørrebro Bryghus Liquor कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हेन्रिक वांग यांनी यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले "आम्ही मानवी मूत्र फिल्टर करतो आणि ते बिअरमध्ये एक घटक म्हणून जोडतो हे ऐकल्यानंतर आम्हाला खूप हसू आले".

त्यांनी सांगितले की "फक्त गटारं आणि नाल्यांमध्ये वाहून जाणारे मूत्राचा पुनर्वापर करण्याचा आमचा उद्देश होता. त्यामुळे आम्ही बार्लीच्या शेतासाठी खत म्हणून 50,000 लिटरपेक्षा जास्त मूत्राचा वापर केला आणि या प्रयोगाममुळे पीक चांगल्या प्रमाणात आले. म्हणून आम्ही उत्पादनाचं नाव पिन्सर ठेवलं आणि त्यापासून बिअर बनवली. हाच ब्रँड नंतर पिल्सनर बिअर म्हणून ओळखला जाऊ लागला." (Lifestyle News)

पिकांसाठी खत चांगले की मानवी मूत्र?

2012 मध्ये रिच अर्थ इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांना प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये आढळून आले की मानवी मूत्र वापरून घेतलेली पिके कृत्रिम नायट्रोजन डायऑक्साइड खतांचा वापर करून पिकवलेल्या पिकांपेक्षा दुप्पट उत्पादन देतात आहेत. याशिवाय मुत्राच्या साह्याने उगवलेली पिकं रसायनांचा वापर करून पिकवलेल्या पिकांच्या तुलनेत आरोग्यसाठी चांगले असल्याचे सिद्ध झाले. (Latest Political News)

मोठमोठे ब्रँड बनवतात पिल्सनर बिअर

आजकाल अनेक मद्य कंपन्या मानवी मूत्रांचा वापर करत आहेत. रासायनिक खतांच्या तुलनेत मुत्राच्या वापरामुळे पीक दुप्पट येते. हेच कारण आहे की आज अनेक बिअर कंपन्या पिल्सनर नावाच्या श्रेणीतील बिअर विकत आहेत. या बिअर पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्यांना ही आयडिया देखील आवडली आहे. या प्रकारची बिअर प्रत्येक देशात विकली जात नाही. काही निवडक ठिकाणीच ती उपलब्ध आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT