Maharashtra Live News Update: आम्ही महापालिका जिंकणारच; उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक 20 नोव्हेंबर २०२५, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, राज्यातील राजकीय घडामोडी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, बिहार सरकार स्थापन, दिल्ली स्फोट अपडेट, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार, महायुती, महाविकास आघाडी राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

आम्ही महापालिका जिंकणारच; उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त

अल्पवयीन मुलगी अत्याचार करून खून प्रकरण; युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध

नाशिकच्या मालेगाव येथील डोंगराळे येथील अल्पवयीन मुलगी अत्याचार करून खून प्रकरण..

अमरावतीत रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध...

अमरावतीच्या राजकमल चौकात कॅन्डल मार्च काढून पीडित मृतक बालेकिला सामूहिक रित्या दिली भावपुर्ण श्रद्धांजली

दोषी घटनेतील आरोपीला तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी

भिवंडीमध्ये उभ्या असलेल्या कारला अचानक लागली आग

भिवंडी शहरातील गैबी नगर परिसरात एका कंपाऊंडमध्ये उभी असलेल्या कारने अचानक पेट घेतल्याने या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. जवळच एका ठिकाणी कचरा फेकला होता. त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली होती. ती आग पसरून जवळ असलेल्या कारला लागली. यामुळे उभी असलेली कार जळून खाक झाली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाडी ही आग आटोक्यात आणली असून संपूर्ण आग विझली आहे.

अंबरनाथमध्ये ‘नाशिक पॅटर्न’ची धडाकेबाज अंमलबजावणी

अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर अंबरनाथ पोलिसांनी कठोर भूमिका घेत नाशिकमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘नाशिक पॅटर्न’ची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने एका दिवसात तीन नागरिकांवर प्राणघातक हल्ले करून शहरात मोठी दहशत निर्माण केली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी जलदगतीने अटक केली आणि आज या सर्व आरोपींची संपूर्ण शहरातून धिंड काढत त्यांना सार्वजनिकरित्या उघडपणे फिरवण्यात आले.

Kolhapur : भोंदू मांत्रिकाच्या दरबारात दार तोडून पोलिसांनी केला पंचनामा

कोल्हापुरातील चुटकी वाल्या भोंदू मांत्रिकाच्या दरबारात दार तोडून पोलिसांनी केला पंचनामा

चुटकी वाले मांत्रिकाच्या दरबारात अनेक आक्षेपार्ह वस्तू पोलिसांना आढळल्या

करणी साठी वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू पोलिसांनी घेतल्या ताब्यात

चुटकी वाले बाबा मांत्रिकाच्या दरबारात अनेक फोटोंवर मारले होते खिळे

सर्वात आधी साम टीव्ही ने चुटकी वाले मांत्रिकाचा केला होता पर्दाफाश

नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त ठरला

नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. उद्या संध्याकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. गेल्या आठवडाभरापासून या अनावरणासाठी विविध संघटनांनी आंदोलन सुरू केले होते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरे यांनी विनापरवानगी पुतळ्याचे अनावरण केल्याने वाद निर्माण झाला होता. यामुळे अधिकृत अनावरण सोहळा शांतता आणि शिस्तीत पार पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचा वर्धापनदिन; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत १५ ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार

शिवसेना भवनातील ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात १५ ज्येष्ठ शिवसैनिकांचा विशेष सत्कार तर सुमारे ८०० शिवसैनिकांना मानपत्र प्रदान केले जाणार आहे. तसेच ‘शिवस्वर संध्या’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार असून, शिवसैनिकांच्या योगदानाचा गौरव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जाणार आहे.

धुळ्यात पुन्हा बिबट्याचा हल्ला, दोन तरुण जखमी 

धुळ्यातील साक्री तालुक्यातील भाडणे शिवार गावात बिबट्याची दहशत पुन्हा वाढली असून दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांवर बिबट्याने अचानक झडप घातली. भाडणे गावाहून नांदवनकडे जात असताना आशापुरी मंदिराजवळ हा हल्ला झाला. यात हर्षल शेवाळे आणि ज्ञानेश्वर बिचकुले हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात मोठी भीती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील दक्षता घेत आहेत.

जालनामध्ये 45 वर्षीय व्यक्तीवर तलवारीने हल्ला करून हत्या

बाबासाहेब सोमधाने मयत वक्तीचे नाव,

मयत भाजीपाला घेत असताना, चार चाकी वाहनात आलेल्या तीन जणांकडून भर बाजारात तलवारीने हल्ला...

पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात..

जुना वाद आणि जमिनीच्या व्यवहारातून वाद झाल्याने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज...

भरधाव अनियंत्रित चारचाकी कारने चार जणांना उडवले.अमरावती शहरातील मोती नगर मधील धक्कादायक घटना

अमरावती शहरातील मोती नगर चौकात सकाळी सुसाट वेगाने येणाऱ्या कार ने चार लोकांना जोरदार धडक दिली...कार सुसाट वेगाने येत असताना मोती नगर चौकात अचानक एकच खळबळ उडाली.. युवतीचे कार वरील नियंत्रण सुटून कारने रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी चालकाला तसेच हात गाडी चालकाला धडक दिली..हा धक्कादायक प्रकार पाहून अनेकांनी आपला जीव मुठीत घेऊन रस्त्याच्या कडेला पळाले. या अपघातानंतर संतप्त जमावाने दगड व लाथा बुक्क्याच्या साहाय्याने कारचे दरवाजे व कार फोडून टाकली.

शितल तेजवानीची पुणे पोलिस आयुक्तलयात EOWकडून चौकशी

कल्याणमध्ये शिवसेना उमेदवारांचा प्रचार सुरू धनुष्यबाणाला मत देण्याचं नागरिकाना आवाहन

कल्याण डोंबिवलीत महायुती बाबत अद्यापही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. भाजप आणि शिवसेनेचे अंतर्गत फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी मात्र पॅनल नीहाय प्रचार सुरू केल्याच्या पाहायला मिळते. कल्याण मधील पॅनल क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी शिवसेनेचा प्रचार सुरू केला आहे पॅनल मधील चारही इच्छुक नगरसेवकांसोबत त्यांच्या नागरिकांशी बैठका सुरू झाल्या असून तुमचं मत धनुष्यबाणालाच द्या ,विकासाला द्या ,कुणाच्या आमिषाला बळी पडू नका असे आवाहन जिल्हा प्रमुख मोरे करत आहेत .

Pune : प्रलंबित प्रश्नांसाठी प्राध्यापकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाच वर्षांची मुदत पूर्ण केलेल्या प्राध्यापकांना व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार वीस वर्षे किंवा सेवा निवृत्तीपर्यंतचे सेवा सातत्य देण्यात यावे.

तसेच भविष्यनिर्वाह निधी बाबत शासनाने काढलेले परिपत्रक विद्यापीठाने तात्काळ मागे घ्यावे,या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्पुक्टो संघटनेतर्फे आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे.

एकीकडे प्राध्यापक कमी असल्याने विद्यापीठाचे रॅकिंग घसरत असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगितले जात असताना विद्यापीठाकडून कंत्राटी प्राध्यापकांना अन्यायकारक वागणूक दिली जात आहे. त्यामुळे प्राध्यापक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Maharashtra : पंढरपुरात अवैध वाळू उपसा विरोधात मोठी कारवाई

पंढरपूर पोलिसांनी भीमा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान 1 कोटी 25 लाख 88 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई पंढरपूरच्या गुरसाळे व शेळवे येथील भीमानदी पात्रात करण्यात आली आहे.

गुरसाळे येथे कारवाई दरम्यान 58 लाख 80 हजार तर शेळवेत 67 लाख 8 हजार रुपये असा एकूण 1 कोटी 25 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यामध्ये जे.सी.बी., टिपर, एक टेम्पो, दोन ट्रॅक्टर , मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Politics : अनिल देशमुख यांचे सुपुत्र शैल देशमुख यांनी शरद पवार गटाचा पक्षाचा सदस्यतेचा राजीनामा दीला

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र शैल देशमुख यांनी शरद पवार गटाचा पक्षाचा सक्रिय सदस्यतेचा राजीनामा दीला...पक्षाचे नेते शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवला..

एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू असताना अचानकपणे प्रकृतीचे कारण देत त्यांनी डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मी आराम करत आहे. त्यासाठी राजीनामा दिल्याचे सांगितलं..

उद्या दुसऱ्या पक्षात जाणार आहे का यावर उत्तर देताना ते म्हणाले उद्याची परिस्थिती काय असेल ते माहित नाही. मात्र सध्या प्रकृतीच्या कारणांनी मी राजीनामा देत असल्याचा सुतवाच केला आता दुसरीकडे दुसऱ्या पक्षात तर जात नाही ना असे संकेतही बोलण्यातून दिसून येत आहे.

Mumbai : मीरा भाईंदर वॉर्ड क्रमांक ६ मध्ये महापालिकेची अनधिकृत बांधकामावर कारवाई

मीरा भाईंदर वॉर्ड क्रमांक ६ मध्ये महापालिकेची अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईला सुरवात झाली आहे.

आयुक्त राधाबीनोद शर्मा यांच्या उपस्थितीत २६ अवैध बांधकामे पाडण्यात आली असून अधिक २५ अनधिकृत बांधकामे संध्याकाळपर्यंत हटवली जाणार असल्याचे पालिकेकडून बोलले जात आहे.

आयुक्त राधाबीनोद शर्मा यांनी अधिकाऱ्यांना कारवाई जलद आणि नियमांनुसार करण्याच्या सूचना दिल्या आहेत

कारवाई दरम्यान पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Malegaon News : मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्ये प्रकरणी न्यायालयात तणाव

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि खूण प्रकरणात मालेगाव न्यायालयात तणाव..

न्यायालय आवारात महिलांचा आक्रोश तर तरुणांचा ठिय्या, मोठा तणाव

न्यायालय आवरच्या दोघेही बाजूंना चोख बंदोबस्त...

न्यायालयीन आवारातील परिस्थिती बघता आरोपाला आणणार की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

Maharashtra Politics : शिरोळ, जयसिंगपूर नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे गळ्यात गळे

शिरोळ, जयसिंगपूर नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे गळ्यात गळे

महादेवराव महाडिकांची ताराराणी आघाडी आणि सतेज पाटलांचा काँग्रेसचा गट ही एकत्र

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या विरोधात शिरोळ तालुक्यात मोट

राज्यात आणखी एका ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला एकाकी पाडलं

Jalgaon : जळगावच्या जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध

जळगावच्या जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध..

जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत साधना महाजन या नगराध्यक्ष मधून बिनविरोध विजय झाल्या आहेत..

नगराध्यक्ष पदासाठीच्या विरोधी पक्षातल्या तिन्ही उमेदवारांनी आज माघार घेतल्याने साधना महाजन बिनविरोध झाल्या आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या साधना महाजन बिनविरोध विजयी झाल्या आहेत..

नगराध्यक्ष बिनविरोध होणारी जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील पहिली नगरपालिका आहे

Pune : कुत्रा मागे लागल्याने तिसऱ्या मजल्यावर खाली कोसळला अन् जीव गमावला

कुत्रा मागे लागल्याने तिसऱ्या मजल्यावर खाली कोसळला अन् जीव गमावला

पुण्यातील इलेक्ट्रिशियन चा दुर्दैवी मृत्यू

कुत्रा मागे लागल्याने घाबरून पळाला आणि थेट सोसायटीच्या डक्ट मध्ये पडून मृत्यू

पुण्यातील कसबा पेठेतील धक्कादायक घटना

मुंबई बेंगलोर महामार्गावर अपघात

मुंबई बेंगलोर महामार्गावर अपघात

एस टी बसचा ब्रेक फेल होऊन झाला अपघात

अपघातात सुदैवाने कोणी ही जखमी नाही

दुपारी २.३० च्या सुमारास अपघात

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कात्रज रोड वर झाला अपघात

एस टी बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात घडला आणि त्यानंतर अचानक बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला

कल्याण पूर्वेत शिवसेनेचा डॅमेज कंट्रोल ,सुमारे शेकडो पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

कल्याण पूर्वेत भाजपने शिवसेनेचे दोन नगरसेवक फोडल्यानंतर शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे. शिवसेना शिंदे गटाने पदाधिकाऱ्यांची बैठक घेत पदाधिकाऱ्यांच्या पद नियुक्त्या केल्या . येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे कडून नियुक्ती करण्यात आल्या,त्याना नियुक्तीपत्र आज दिले गेले . महापालिका निवडणूक शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील असं दावा यावेळी गोपाळ लांडगे त्यांनी केला . शिवसेनेचे दोन नगरसेवक भाजपाच्या गळाला लागल्याने डॅमेज कंट्रोल साठी तर शिवसेनेचे प्रयत्न सुरू झाले नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पुण्यात १ लाख रुपयांचा नायलॉन मांजा जप्त

पुण्यात १ लाख रुपयांचा नायलॉन मांजा जप्त

हडपसर रेल्वे स्टेशनच्या परिसरात नायलॉन मांजा विकणार्‍या २ जणांना अटक

बंदी असताना नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वेमध्ये काँग्रेसची आढावा बैठक

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे मध्ये काँग्रेसची आढावा बैठक...

नगरपरिषद,नगरपंचायत निवडणूकच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची प्रचारार्थ पहिली कार्यकर्ता बैठक..

हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रचाराचा फोडला नारळ

बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे यांची होती उपस्थिती....

यावेळी चांदुर रेल्वे, धामणगाव,नांदगाव खंडेश्वर,येथील तिन्ही नगरपरिषद निवडून आनण्याचा केला निश्चय

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात 11 ठिकाणी तब्बल १४२ पथके गठित

यवतमाळ जिल्ह्यात दहा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नामांकनाची प्रक्रिया आटोपल्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक काळात होणारी उलाढाल लक्षात घेता ११ ही ठिकाणी तब्बल १४२ पथके गठित करण्यात आली आहे. शिवाय शहराच्या सीमेवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. निवडणूक काळात या पथकांचा उमेदवारांवर वॉच असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी प्रशासनाला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. पैसा, दारूची वाहतूक, मतदारांना विविध प्रलोभने, वस्तू, पैशांचे वाटप यांसारखे प्रकार निवडणूक काळात घडतात त्यामुळे निवडणुकीत असे गैरप्रकार रोखण्यासाठी विविध पथकांचे गठण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Pune: मुंढवा प्रकरणात शीतल तेजवानी चे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू

जमिनीचे सर्व महत्वाचे कागदपत्र सादर करण्याच्या तेजवानी यांना पोलिसांच्या सूचना

महारवतन, शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनी यांच्यातील सर्व कागदपत्रांची पडताळणी

व्यवहार झाला नसल्याचं शीतल तेजवानी यांची पोलिसांना माहिती

पॉवर ऑफ attorney वेळी कुठल्या कागदपत्रांची देवाण घेवाण झाली याबद्दल सुद्धा तेजवानी यांच्याकडून चौकशी

Kolhapur: कोल्हापुरातील चुटकी वाल्या भोंदू मांत्रिकाच्या दरबारावर पोलिसांचा छापा

कोल्हापुरातल्या उपनगरात या चुटकीवाल्या भोंदू मांत्रिकाचा सुरू होता दरबार

अनेक नागरिकांची फसवणूक केल्याने भोंदू बाबाच्या शोधात पोलीस

गेल्या आठवड्यात स्मशानभूमीत भूत काढणाऱ्या चुटकी वाल्या बाबाचा साम टीव्ही ने केला होता पर्दाफाश

Pune: पुणे महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर

पुणे महापालिकेचा निवडणुकीसाठी शहरात 35 लाख 51 हजार 469 मतदार

प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वाधिक 1 लाख 60242 मतदार

सर्वात कमी मतदार प्रभाग क्रमांक 39 मध्ये 62 हजार 205

पुणे शहरात एकूण तीन लाख 468 इतके दुबार मतदार

या मतदारांनी कोणत्यातरी एका ठिकाणी मतदान करावे यासाठी पुढच्या काळात फॉर्म भरून घेतले जाणार

दुबार मतदार नावांपुढे दोन स्टार असणार

ही प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती नोंदविता येणार

वैयक्तिक हरकत नोंदता येईल तसेच सोसायट्यांमध्ये विभागणी झाले असेल तर त्याबाबत सोसायटीचे अध्यक्ष सचिव यांना हरकत नोंदवता येणार आहे पण एकत्रितपणे राजकीय लोकांना हरकत नोंदता येणार नाही

Pune:शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

आर्थिक गुन्हे शाखेकडे तेजवानी या या त्यांच्या वकिलांसह उपस्थित

तेजवानी यांना चौकशीसाठी पोलिसांनी बजावली होती नोटीस

तेजवानी या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त यांच्याकडे हजर झाल्या आहेत

Chikhaldara: नगरपरिषद निवडणूकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंधू आल्हाद कलोती बिनविरोध

चिखलदरा नगरपरिषद निवडणूक मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंधू आल्हाद कलोती बिनविरोध

कांग्रेस उमेदवार शेख इर्शाद शेख जमील शेख तसेच नथ्थू खडके, नामदेव खडके माघार.

आमदार रवि राणा यांचा पुढाकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांना फोन वर शुभेछ्या दिल्या.

नवले ब्रीज पुन्हा उभारणार- मंत्री उदय सामंत

कात्रज चौक आणि नवले ब्रीज यांचेही काम करणार, भविष्यात असे घडू नये यासाठी नव्याने नवले पुल उभा राहील

पैसे येत जातात मात्र कॉलिटी काम करण्याची जबाबदारी नेत्यांची असते

लोकांच्या मनातील गैरसमज

विकासात्मक कामातून दूर केले पाहिजे

नगर विकास खात तुमच्या सोबत आहे सांगण्यासाठी हा जी आर घेऊन मी आलो आहे..

आज गणपती समोर एक संकल्प करा कात्रज मधील 17 नगरसेवक पैकी 17 नगरसेवक आपल्या विचाराचे निवडून आले पाहिजेत हा संकल्प करा

कात्रज विकास आघाडीला पैसे यापुढे कमी पडणार नाही. आम्हाला आशीर्वाद द्या- मंत्री उदय सामंत

Beed: बीडच्या आष्टी तालुक्यातील राक्षस भवन परिसरात बिबट्याचा वावर

आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी परिसरात काल रात्री बिबट्या मुक्त संचार करत असतांना तसेच येणाऱ्या वाहनांवर झेप घेतांनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत तर गेवराई तालुक्यातील राक्षस भवन तळणेवाडी परिसरातही बिबट्याचे दर्शन झाल आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भयभीत वातावरण झाला असून शेतकऱ्यांसह शाळकरी मुलं यांच्यामध्ये भीतीच वातावरण पाहायला मिळत आहे. आष्टी तालुक्यात नागरिकान मध्ये मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभाने तात्काळ या परिसरात पिंपरा बसून हा बिबट्या पकडण्यात यावा अशी मागणी नागरीकां कडून केली जात आहे.बावी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी राजू गोल्हार यांचा एक महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता.पुन्हा अशी घटना होऊ नये यासाठी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्या पकडावा अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

Ambernath: अंबरनाथ निवडणुकीत गोंधळ! उमेदवार व नागरिकांमध्ये संभ्रम; चिन्हाखाली पक्षांची नावे गायब

अंबरनाथ नगरपालिका सार्वजनिक निवडणूक 2025 ला सुरुवात झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. नागरिक व उमेदवारांना कोणत्या पक्षाचे कोणते चिन्ह आहे हे स्पष्ट व्हावे म्हणून नगरपालिकेच्या बाहेर एक विशेष माहितीफलक उभारण्यात आला आहे. मात्र या फलकावर गंभीर उणिवा दिसून आल्या आहेत.

राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हांमध्ये भाजपचे कमळ, काँग्रेसचा हात, बहुजन समाज पक्षाचा हत्ती, कम्युनिस्ट पक्षाची चिन्हे यांचा उल्लेख व्यवस्थित करण्यात आला असला तरी एका झाडू चिन्हाचा उल्लेख पक्षाच्या नावाविना दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

याहूनही गंभीर बाब म्हणजे—ही निवडणूक ज्या महाराष्ट्र राज्यात होत आहे, त्या राज्यातील राज्यस्तरीय पक्षांच्या चिन्हांखाली त्यांच्या पक्षांची नावे अजिबात दिलेली नाहीत. त्यामुळे घड्याळ कोणाचे? धनुष्यबाण कोणाचा? मशाल कोणाची? रेल्वे इंजिन कोणाचे? तुतारी वाजवणारा माणूस कोणत्या पक्षाचा? — असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Pune-Mangaon:पुणे माणगांव मार्गावर ताम्हिणी घाटात भीषण अपघात

पुणे ते माणगाव दरम्‍यान ताम्हीणी घाटात थार गाडी 500 फूट खोल दरीत कोसळून झालेल्‍या अपघातात चार जणांचा जागीच मृत्‍यू झाला आहे. अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी खोल दरीत कोसळली. या अपघातग्रस्‍त वाहनात आणखी प्रवासी असण्‍याची शक्‍यता लक्षात घेवून ड्रोनच्‍या सहाय्याने त्‍यांचा शोध घेतला जात आहे. माणगाव पोलीस आणि बचाव पथके घटनास्‍थळी पोहोचली असून अपघातग्रस्‍त वाहन आणि मृतदेह बाहेर काढण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. पुण्‍यातील काही जण सोमवारी या गाडीने फिरण्‍यासाठी घराबाहेर पडले होते. परंतु ते घरी परत आले नाहीत म्‍हणून पुण्‍यातील पोलीस ठाण्‍यात याबाबतची तक्रार दाखल झाली होती. त्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर ताम्हिणी घाटात काही अपघात झाला आहे का याचा शोध पोलीस घेत असताना एका अवघड वळणावर रस्‍त्‍यालगतचे बॅरीगेटस तुटलेल्‍या अवस्‍थेत आढळून आले. पोलीसांना संशय आल्‍याने त्‍यांनी ड्रोनच्‍या मदतीने शोध घेतला असता खोल दरीत ही गाडी आणि मृतदेह आढळून आले आहेत.

Bihar Oath Taking Ceremony LIVE: नीतीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावेळी नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा उपस्थित आहेत.

Bihar Oath Taking Ceremony LIVE:  नीतीश कुमारांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल

आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नीतीश कुमार शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी नरेंद्र मोदी दाखल झाले आहेत. याचसोबत अमित शाह आणि जेपी नड्डादेखील उपस्थित आहेत.

Bihar Oath Taking Ceremony LIVE: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी नीतीश कुमार अमित शाहांना भेटणार

नीतीश कुमार हे पाटणातील मौर्य हॉटेल येथे पोहचले आहेत. ते अमित शाह यांच्यासोबत चर्चा करतील. त्यानंतर शपथविधीसाठी गांधी मैदान येथे रवाना होतील.

Ahilyanagar: कोळपेवाडी–माहेगाव देशमुख परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद..

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख शिवारात 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी एका दाम्पत्यावर बिबट्याने केला होता हल्ला...

भाऊसाहेब वाघडकर (62) आणि आशाबाई वाघडकर (55) हे दोघे दुचाकीवरून जात असताना बिबटयाच्या हल्ल्यात झाले होते जखमी...

नागरिकांच्या मागणीनंतर वनविभाग तात्काळ परिसरात लावला होता पिंजरा...

पकडलेला बिबट्या राहुरी वनकार्यालयात हलविणार...

Shirdi: पक्षातून हकालपट्टी होताच ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर

पक्षाचा AB फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतून अहिल्यानगरच्या राहाता शहरातील निष्ठावान पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.. पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे आणि शहर समन्वयक भागवत लांडगे यांना अश्रू अनावर झाल्याचे बघायला मिळाले.. जिल्ह्यातील ठाकरे सेना ही कोल्हे - थोरात सेना झाली असल्याचा आरोप पठारे यांनी केला असून आम्ही निष्ठावान राहिलो ही आमची चूक होती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय..

Bihar Oath Taking Ceremony: नीतीश कुमारांसह २५ मंत्री घेणार शपथ

नितीश कुमार यांच्यासोबत आज कोण कोण मंत्रीपदाची शपथ घेणार याची नावे समोर आली आहे. सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा हे उपमुख्यमंत्रीपदाची शपख घेणार आहे. भाजपचे १२ आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेतील. तर जेडीयूचे ७ आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेतील.

Nandurbar: सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये थंडीची लाट तापमान 9 अंश सेल्सिअस...

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याचा डोंगर रांगांमध्ये तापमानात कमालीची घट आली असून राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे 9 ° c तापमानाची नोंद करण्यात आली आहे कडाक्याच्या थंडीचा परिणाम मानवी जन जीवनावर होत असल्याचे दिसून येत आहे त्याचप्रमाणे कडाक्याच्या थंडीसह सातपुड्याचा डोंगर रांगांमध्ये दाट असे धुके दिसून येत आहे एकूणच सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये खालवलेल्या तापमानाचा परिणाम मानवी जन जीवनावर झाला असून थंडीपासून रक्षणासाठी शेकोटीनचा आधार घेतला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे

Ngapur: नागपूर जिल्ह्यातील कॅाग्रेसचा अंतर्गत संघर्ष टोकाला

- माजी महासचिवांनी मुजीब पठान यांनी केली सुनील केदार यांची राहूल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार

- “माजी मंत्री सुनील केदार यांनी भाजप, RSS ची सुपारी घेऊन बुटीबेरीत पंजा गोठवला”

- “बुटीबोरीत सुनील केदार यांनी RSS च्या व्यक्तीला उमेदवारी दिली”

- बुटीबेरी नगरपरिषद निवडणूकीत पंजा गोठवल्यामुळे कॅाग्रेस नेते मुजीब पठान यांनी केली तक्रार

- “सुनील केदार यांनी कॅाग्रेस कार्यकर्त्यांनर अन्याय केला असून, त्यांच्यावर कारवाईची हायकमांडकडे मागणी”

- “बुटीबेरी निवडणूकीत पंजा गायब, नगराध्यक्ष पदासाठी कॅाग्रेसचे चार उमेदवार असताना एकालाही एबी फॅार्म नाही”

- नागपूर जिल्ह्यातील कॅाग्रेस गटबाजीची थेट हायकमांडकडे तक्रार

Bihar Election: चिराग पासवान यांच्या पक्षातील दोघेजण घेणार मंत्रि‍पदाची शपथ

चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली लोक जनशक्ती पक्षाचे दोघेजण मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहे. संजय कुमार पासवान आणि संजय सिंह हे पक्षाचे मंत्री असतील.

Digvijay Patil: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समिती समोर दिग्विजय पाटील झाले हजर

कालच नोटीस मिळाली असल्याने म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्याची अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांनी केली मागणी

राज्य सरकारने नेमलेल्या खारगे चौकशी समितीने दिग्विजय पाटील आणि शितल तेजवानी यांना बजावले होते समन्स

दिग्विजय पाटील यांनी दोन आठवड्याचे मुदत द्यावी अशी मागणी समिती समोर केली केली आहे

समितीने 28 नोव्हेंबर पर्यंत म्हणणे मांडण्यास दिली वेळ

Nagpur: नागपूर जिल्ह्यातील कॅाग्रेसचा अंतर्गत संघर्ष टोकाला

- नागपूर जिल्ह्यातील कॅाग्रेसचा अंतर्गत संघर्ष टोकाला

- माजी महासचिवांनी मुजीब पठान यांनी केली सुनील केदार यांची राहूल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार

- “माजी मंत्री सुनील केदार यांनी भाजप, RSS ची सुपारी घेऊन बुटीबेरीत पंजा गोठवला”

- “बुटीबोरीत सुनील केदार यांनी RSS च्या व्यक्तीला उमेदवारी दिली”

- बुटीबेरी नगरपरिषद निवडणूकीत पंजा गोठवल्यामुळे कॅाग्रेस नेते मुजीब पठान यांनी केली तक्रार

- “सुनील केदार यांनी कॅाग्रेस कार्यकर्त्यांनर अन्याय केला असून, त्यांच्यावर कारवाईची हायकमांडकडे मागणी”

- “बुटीबेरी निवडणूकीत पंजा गायब, नगराध्यक्ष पदासाठी कॅाग्रेसचे चार उमेदवार असताना एकालाही एबी फॅार्म नाही”

- नागपूर जिल्ह्यातील कॅाग्रेस गटबाजीची थेट हायकमांडकडे तक्रार

Bihar Government: बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील नितीश कुमार सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत

ते या सोहळ्यासाठी पाटण्याला रवाना झाले आहेत

ते सुमारे अडीच तास पाटण्यामध्ये राहतील

बिहार निवडणुकीत आदित्यनाथ यांनी ३१ सभा घेतल्या

योगींनी ज्या ज्या जागांवर सभा घेतल्या त्यापैकी २७ जागांवर एनडीए उमेदवारांनी विजय मिळवला

Nanded:  क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याच्या सूचना

नांदेड -

क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याच्या सूचना

विद्यापीठाने विद्यार्थ्यांची पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचे जोरदार आंदोलन

Nashik: नाशिकच्या मोरे मळा परिसरात बिबट्या जेरबंद

नाशिक -

मोरे मळा परिसरात बिबट्या जेरबंद

अप्पा शिंदे यांच्या मळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून होता बिबट्याचा वावर

वन विभागाकडून लावण्यात आला होता पिंजरा

याच बिबट्याने यापूर्वी या भागातील अनेक कुत्रे केले होते फस्त

अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या झाला जेरबंद

मोरे मळा परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास ..

Pune: रुपाली ठोंबरेंनी माधवी खंडाळकर यांना पाठवली १० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस

पुणे -

रुपाली पाटील यांनी माधवी खंडाळकर यांना पाठवली १० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस

रूपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांच्यातील वाद पेटणार

१० कोटींची नुकसान भरपाई देण्यासाठी पाठवली कायदेशीर नोटीस

काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील यांच्या बद्दल माधवी खंडाळकर यांनी एक पोस्ट लिहिली होती

त्यावरून दोघींमध्ये बराच वाद झालेला होता

यावरूनच आता रुपाली पाटील यांनी खंडाळकर यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे

Kolhapur: चुटकीवाल्या भोंदू मंत्रीकाच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची छापे

कोल्हापूर -

चुटकीवाल्या भोंदू मंत्रीकाच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची छापे

चुटकीवाला भोंदू मांत्रिक वाई मध्ये असल्याचं कळताच सातारा आणि वाई इथं कोल्हापूर पोलिसांचे छापे

रात्री उशिरा कोल्हापूर पोलिसांनी मारले छापे

पोलीस येणे अगोदरच चुटकीवाला बाबा गायब पोलिसांची शोध मोहीम सुरू

चुटकी वाजवून भूत काढणाऱ्या मांत्रिकाचा साम टीव्हीने केला होता पर्दाफाश

Amravati: सुर्जी नगरपरिषदमध्ये भाजपकडून एकाच जागेसाठी दोन जणांना दिले एबी फॉर्म

अमरावती -

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगरपरिषदमध्ये भाजपकडून एकाच जागेसाठी दोन जणांना दिले एबी फॉर्म

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईने निवडला गोंधळ.

प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवकाच्या सर्वसाधारण जागेसाठी भाजपाने दोन उमेदवारांना दिले होते एबी फॉर्म..

सचिन जायदे आणि अजय पसारी यांना देण्यात आला होता भाजप कडून एबी फॉर्म....

सचिन जायदे यांचा उमेदवारी अर्ज ठरवला अवैध त्यामुळे अजय पसारी यांची उमेदवारी कायम..

Ahilyanagar: शिर्डी शहरातील उपनगरात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

अहिल्यानगर -

शिर्डी शहरातील उपनगरात बिबट्याचा मुक्त संचार

माऊली नगर भागातील बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेरात कैद

शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागांत बिबट्यांचा मुक्तसंचार बनला चिंतेचा विषय

शिर्डी शहरातील उपनगरात पिंजरा लावावा, नागरिकांची मागणी

Pune: खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

पुणे

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी मोहोळ यांची गडकरी यांच्याशी चर्चा

नवले पूल परिसरात होणाऱ्या अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात, याबाबत दोघांमध्ये मध्ये चर्चा

अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

मागील आठवड्यात झालेल्या भीषण अपघातानंतर बैठकीतील मुद्द्यांबाबत सुद्धा मोहोळ यांनी दिली गडकरी यांना माहिती

Nagpur:  सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त भाजप युवा मोर्चातर्फे पदयात्रा

नागपूर -

- सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त भाजप युवा मोर्चातर्फे पदयात्रा

- नागपूर, जयपूर, मुंबई आणि दिल्ली या देशाच्या प्रमुख शहरांमध्ये नजीकच्या राज्यातील युवा येणार एकत्र.

- युनिटी मार्च मध्ये देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातील चार युवा सहभागी होणार असून भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्याचा नेतृत्वात निघणार यात्रा.

- नागपूर मधून चारशे युवक वाहनाने मध्यप्रदेश मार्गाने गुजरातला जाणार आहेत. यात्रेत विविध उपक्रमही राबवले जाणार.

Nagpur: नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जाहीर होणार प्रारूप मतदार यादी

नागपूर -

- नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जाहीर होणार प्रारूप मतदार यादी

- विधानसभेच्या एक जुलै 2025 च्या मतदार यादीवर आधारित असणार यादी

- 27 नोव्हेंबर पर्यंत ही यादी मनपाच्या झोन कार्यालयात तसेच मनपाच्या संकेतस्थळावर असणार उपलब्ध

- नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या कामाला प्रशासकीय वेग, पण दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचा आराक्षण मर्यादा ओलांडल्यानं याचिकेत काय निर्णय लागतो यामुळे धाकधूक वाढली आहेय...

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात 61 हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी आटोपल

यवतमाळ जिल्ह्यात 61 हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी आटोपल

यवतमाळ जिल्ह्यात यावर्षीच्या रब्बी हंगामात 61 हजार हेक्टवर पेरणी झाली

यामध्ये हरभरा,गहू,मक्का,जवस आणि ज्वारीच्या पिकाचा सर्वाधिक समावेश आहे

येत्या काही दिवसात हे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात हरभरा लागवडीचे आणि गव्हाचे क्षेत्र ही मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com