BJP Congress Alliance: शिंदेंविरोधात भाजप-काँग्रेसची एकी, कोल्हापुरात कुस्तीत दोस्ती

Political Strategy Behind BJP–Congress: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चक्कं भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी युती केलीय... मात्र ही युती नेमकी कुठं झालीय... आणि ही युती करण्यामागचं नेमकं कारण काय आहे..
Leaders from BJP and Congress coming together in Kolhapur to strategize against Shinde Sena ahead of local body elections.
Leaders from BJP and Congress coming together in Kolhapur to strategize against Shinde Sena ahead of local body elections.Saam Tv
Published On

महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही, अशी भूमिका घेतलेल्या काँग्रेसने चक्कं भाजपसोबत युतीची बोलणी सुरु केलीय... एकमेकांचे कट्टर वैरी असलेले भाजप खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक आणि काँग्रेस नेते सतेज पाटील शिंदेसेनेचे आमदार राजेंद्र पाटील यड्राववकर यांच्याविरोधात एकवटलेत..

राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपालिका जिंकली होती.. त्यामुळे आता जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिका जिंकण्यासाठी महाडिक आणि सतेज पाटीलांच्या युतीसाठी बैठका सुरु आहेत.

यापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेत काही ठिकाणी युती झाल्याचं चित्र राज्यानं पाहिलंय...

कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे एकत्र

चाकणमध्ये शिंदेंच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला ठाकरेसेनाचा पाठींबा

कणकवलीतही शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिंदेसेना, ठाकरेसेना एकत्र

स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकर्त्यांची निवडणूक आहे... मात्र या निवडणुकीत राजकीय विचारधारांना तिलांजली देत स्थानिक आघाडींच्या माध्यमातून एकमेकांचे कट्टर वैरी एकत्र येत आहेत.. त्यामुळे राजकीय विचारधारा आणि वैर यापेक्षा सत्ता आणि त्यातून मिळणारा मलिदा वरचढ ठरतोय... हेच या युती-आघाडीतून दिसून येतंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com