Masai Pathar Tourism Saam TV
लाईफस्टाईल

Masai Pathar Tourism : फुलांची चादर घेऊन सजलं कोल्हापुरातील मसाई पठार; नजारा पाहून डोळे दिपतील

Kolhapur Masai Pathar : आधी पन्हाळा आणि नंतर मसाई पठार असा दोन्ही पर्याय पर्यटक निवडत आहेत. मसाई पठारवर फुलांमध्ये ड्रॉसेरा, सोनकी, तेरडा, निलीमा यांसारखी असंख्य प्रकारची फुले फुलली आहेत.

Ruchika Jadhav

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

दरवर्षी सातारा जिल्ह्यातील कास पठारावर फुललेल्या फुलांप्रमाणेच कोल्हापुरातील मसाई पठारावर देखील रंगबिरंगी फुलं मोठ्या प्रमाणात फुलतात. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात कोल्हापुरात असणाऱ्या या पठाराकडे निसर्ग अभ्यासक आणि पर्यटकांची पावले वळू लागतात. कारण हे पठार कोल्हापूरकरांसाठी 'खास' आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गडाच्या शेजारीच असणारे मसाई पठार सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली रंगीबेरंगी फुलांची उधळण अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, दाट धुक्याची दुलई यामुळे पर्यटकांना हवी तशी आनंदपर्वणी आणि नेत्रसुख मिळत असल्याने पर्यटक मंडळी सांगत आहेत.

आधी पन्हाळा आणि नंतर मसाई पठार असा दोन्ही पर्याय पर्यटक निवडत आहेत. मसाई पठारवर फुलांमध्ये ड्रॉसेरा, सोनकी, तेरडा, निलीमा यांसारखी असंख्य प्रकारची फुले फुलली आहेत. तसेच दुर्मिळ औषधी वनस्पती याठिकाणी पाहायला मिळत आहेत.

मसाई पठार जांभ्या खडकापासून बनले असल्याने काळ्या खडकावर फुलणारी भुईआमरीच्या सहा ते सात प्रजाती येथे आढळतात. तसेच रान कोथिंबीर, सफेद मुसळी, नीलवंती, मंजिरी, सीतेची आसवे, केना, पेनवा यासारख्या विविध रंगाची, आकाराची, छोटीमोठी रान फुले सुद्धा पाहायला मिळतात.

मसाई पठारावर तलावांच्या काठावर पाणथळ परिसरातही मोठ्या संख्येने फुले फुलतात. निसर्गाची ही रंगीबेरंगी दुनिया अनुभवण्यासाठी कोल्हापूरचे हे प्रति कास पठार नव्हे तर 'खास' पठार पाहण्यासाठी पर्यटकांबरोबर निसर्ग अभ्यासकांची पावले ही वळतात.

असा करा प्रवास

मसाई पठाराला भेट द्यायची असेल तर सर्वात आधी तुम्हाला कोल्हापूर गाठावे लागले. कोल्हापूरला आल्यावर येथून तुम्ही बस किंवा रिक्षाच्या मदतीने पठारापर्यंत पोहचू शकता. कोल्हापूरपासून पन्हाळा २० किलोमिटरवर आहे. तर पन्हाळ्यापासून ७ किलोमिटर अंतरावार मसाई पठार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT