Heart Attack In Kids saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack In Kids: लहान मुलांमध्ये ही ५ लक्षणं दिसली व्हा सावध; हार्ट अटॅकचा असतो धोका

Heart Attack In Children: मुलांमध्ये वाढणाऱ्या हृदयविकाराच्या समस्यांमुळे पालकांची चिंता वाढली आहे. छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास, जास्त घाम येणं आणि सतत थकवा ही लक्षणं गंभीर ठरू शकतात, त्यामुळे वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल लहान मुलांमध्येही हृदयाशी संबंधित आजार झपाट्याने वाढताना दिसतायत. पूर्वी फक्त मोठ्या वयाच्या लोकांमध्ये दिसणारा हार्ट अटॅक आता मुलांमध्येही आढळू लागलाय. डॉक्टरांच्या मते, काही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे मुलांमध्ये दिसणाऱ्या काही खास संकेतांकडे वेळीच लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

छातीत दुखणं

मुलाला अचानक छातीत तीव्र वेदना होणं किंवा छातीवर दाब येत असल्यासारखं वाटणं हे हार्ट अटॅकचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. अनेकदा मुलं 'छाती दुखतेय' अशी तक्रार करतात. पण पालक ते सामान्य समजून दुर्लक्ष करतात. मात्र अशी समस्या वारंवार होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

श्वास घेण्यास त्रास

हार्ट नीट काम करत नसेल तर शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे मुलाला धाप लागणं, श्वास घेण्यास त्रास होणं किंवा सतत दम लागल्यासारखं वाटू शकतं. काही वेळा मुलं बोलतानाही किंवा थोडं चालल्यानंतरही खूप थकलेली दिसतात. हे लक्षण धोक्याचं ठरू शकतं.

कारण नसताना जास्त घाम येणं

उन्हाळा किंवा खेळल्यामुळे घाम येणं सामान्य आहे. पण कोणतंही कारण नसताना सतत घाम येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः रात्री झोपेत खूप घाम येत असेल तर हे हृदयाच्या समस्येचं संकेत असू शकतं. शरीरावर अचानक थंड घाम येणं हे देखील गंभीर लक्षण मानलं जातं.

जबडा आणि चेहऱ्यात वेदना

दातांच्या समस्येमुळेच जबड्यात दुखतं असं नाही. काही वेळा हृदयाशी संबंधित त्रासामुळेही चेहरा किंवा जबड्यात वेदना जाणवू शकतात. मुलाला चेहऱ्यावर टोचल्यासारखं वाटणं किंवा जबडा दुखत असल्याची तक्रार असेल तर त्यामागे हृदयविकाराचं कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सतत थकवा जाणवणं

मुलं साधारणपणे उत्साही आणि खेळकर असतात. पण एखादं मूल सतत थकल्यासारखं दिसत असेल, पुरेशी झोप घेतल्यानंतरही अशक्त वाटत असेल किंवा खेळण्यात रस दाखवत नसेल, तर हेही धोक्याचं लक्षण असू शकतं. हृदय व्यवस्थित काम करत नसल्यास शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही आणि त्यामुळे थकवा वाढतो.

टीप : ही माहिती वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. कुठलाही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AFG Test Match: टीम इंडियानं उभारला ५६४ धावांचा डोंगर, गिलचे वादळी शतक, पंतनेही झोडपले

कोरियन मुलींच्या सरळ केसांचे रहस्य काय?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट ₹३००० येणार? मे-जूनचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता, पाहा महत्त्वाची अपडेट

Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; वयाच्या ३३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत हळहळ

आता इंस्टाग्रामसाठी मोजावे लागणार पैसे? 'इंस्टाग्राम प्लस'मध्ये युझर्सना कोणत्या मिळणार सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT