Bank Holiday In December 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Bank Holiday In December 2023 : शेवटच्या महिन्यात 18 दिवस राहणार बँका बंद, एका क्लिकवर पाहा सुट्ट्यांची यादी

Bank Holiday : पुढील डिसेंबरमध्ये बँका 18 दिवस बंद राहणार आहेत. यापैकी 7 सार्वजनिक सुट्या असतील तर 11 इतर सुट्या असतील.

Shraddha Thik

December 2023 :

सुट्टी कोणाला आवडत नाही? मग ती शाळकरी मुले असोत, कॉर्पोरेट कर्मचारी असोत किंवा सरकारी कर्मचारी असोत. सुट्ट्या प्रत्येकाच्या आवडत्या असतात. पण सुट्टी म्हणजे काम बंद. जर तुम्हाला बँकेत काही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल आणि त्या दिवशी बँक बंद असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते. अशा वेळी, तुम्हाला बँकेच्या (Bank) सुट्टीबद्दल आधीच माहिती असणे आवश्यक आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये किती बँक सुट्ट्या येणार आहेत ते जाणून घ्या.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढील डिसेंबरमध्ये बँका 18 दिवस बंद राहणार आहेत. यापैकी 7 सार्वजनिक सुट्या असतील तर 11 इतर सुट्या असतील. 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशी देशभरातील बँका बंद (Banned) राहणार आहेत.

तुम्हालाही डिसेंबरमध्ये बँकेत जायचे असेल तर आधी सुट्टयांची यादी पहा. सर्व राज्यांमध्ये बँका एकाच वेळी बंद होणार नाहीत. अनेक सुट्ट्या फक्त राज्यातच येतात आणि त्याच दिवशी त्या राज्यात बँका बंद असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) rbi.org.in वेबसाइटनुसार, डिसेंबरमध्ये बँका कधी बंद राहतील.

  • 1 डिसेंबर 2023: राज्य उद्घाटन दिनानिमित्त या दिवशी अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये बँक बंद असेल.

  • 3 डिसेंबर 2023: या दिवशी रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.

  • 4 डिसेंबर 2023: सेंट फ्रान्सिस झेवियर सणानिमित्त गोव्यात बँकेला सुट्टी.

  • 9 डिसेंबर 2023 : दुसरा शनिवार असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.

  • 10 डिसेंबर 2023: रविवार असल्यामुळे या दिवशी बँकांना सुट्टी असेल.

  • 12 डिसेंबर 2023: Pa-Togan Nengminja Sangma मुळे मेघालयमध्ये बँकेला सुट्टी असेल.

  • 13 डिसेंबर 2023: Losung/Namsung मुळे सिक्कीममध्ये बँकेला सुट्टी.

  • 14 डिसेंबर 2023: Losung/Namsung मुळे सिक्कीममध्ये बँकेला सुट्टी असेल.

  • 17 डिसेंबर 2023: या दिवशी रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.

  • 18 डिसेंबर 2023: मेघालयमध्ये यू सोसो थाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त बँकेला सुट्टी असेल.

  • 19 डिसेंबर 2023: गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यातील बँकांना सुट्टी असेल.

  • 23 डिसेंबर 2023: चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी.

  • 24 डिसेंबर 2023: रविवारी बँकेला सुट्टी असेल.

  • 25 डिसेंबर 2023: ख्रिसमसमुळे देशभरात बँका बंद राहतील.

  • 26 डिसेंबर 2023: मिझोराम, नागालँड आणि मेघालयमध्ये नाताळच्या सणानिमित्त बँका बंद राहतील.

  • 27 डिसेंबर 2023: नागालँडमध्ये ख्रिसमसमुळे बँका बंद राहतील.

  • 30 डिसेंबर 2023 : मेघालयात U Kiang Nangbah मुळे बँका बंद राहतील.

  • 31 डिसेंबर 2023: रविवारी बँकेला सुट्टी असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

Akshay Kumar : मुंबईतील दोन घरं विकली; अक्षय कुमार झाला मालामाल, नफा वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT