Banana Face Pack Saam Tv
लाईफस्टाईल

Banana Face Pack : फेस्टिव्ह सीझनमध्ये दिसाल बॉलिवूड सेलिब्रिटीसारखे, चेहऱ्याला लावा हा फेसपॅक

Homemade Face Pack : काही घरगुती उपचार केल्यास त्वचा अधिक तजेलदार होण्यास मदत होईल.

कोमल दामुद्रे

Skin Care Tips :

दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा सण. वाढते प्रदूषण, स्क्रीन टाइम आणि धुळीमुळे चेहऱ्याचे अतिप्रमाणात नुकसान होते. दिवाळीच्या काळात प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते. पण, त्वचेची काळजी कशी घ्यावी? दिवाळीत पार्लर किंवा सलूनमध्ये जाऊन स्किन ट्रीटमेंट घेणे नेहमीच शक्य होत नाही.

या काळात महागड्या पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा काही घरगुती उपचार केल्यास त्वचा अधिक तजेलदार होण्यास मदत होईल. जर तुम्हालाही देखील चेहरा ग्लोइंग हवा असेल तर केळीचा वापर करु शकता. हा फेसपॅक कसा तयार करायचा हे जाणून घेऊया ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. केळी आणि दूध

केळी आणि दूध एकत्र करुन मॅश करुन घ्या. त्यात मध घालून चेहऱ्याला (Skin) १५ मिनिटे लावा. नंतर कोमट पाण्याने धुवा. चेहरा चमकण्यास मदत होईल.

2. केळी आणि कोरफड

केळी (Banana) आणि कोरफडचा फेस पॅक चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी केळी मॅश करा. त्यात एक चमचा एलोवेरा जेल घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटे लावून ठेवा. नंतर पाण्याने (Water) धुवा.

3. केळी आणि काकडी

केळीसह काकडीचा फेस पॅक तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. यासाठी केळी मॅश करुन त्यात काकडीचा रस मिसळा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत दाखल

World Physiotherapy Day : बाळंतपणानंतर पाठदुखी, कमजोरी आणि डिप्रेशनमुळे त्रस्त आहात? मग फिजिओथेरपी ठरेल सगळ्यात बेस्ट ऑपशन

बुलेट ट्रेनचं काम सुसाट! मुंबईतील महत्वाचा टप्पा पार केला, पाहा VIDEO

Mira Bhayndar : एकाच कुटुंबातील ६ जणांना विषबाधा; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

UPS Scheme: १० वर्षे नोकरी केल्यानंतरही मिळणार पेन्शन, मासिक वेतनासाठी 'या' योजनेत करा गुंतवणूक

SCROLL FOR NEXT