High Cholesterol Warning Signs SAAM TV
लाईफस्टाईल

Cholesterol control: शरीरात शांतपणे वाढतंय वाईट कोलेस्ट्रॉल; आजच बदला या ७ सवयी, नाहीतर वाढेल हार्ट अटॅकचा धोका

High cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, धूम्रपान टाळणे आणि पुरेशी झोप यांसारख्या सवयींमुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल बदलती जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या झपाट्याने वाढतेय. कोलेस्ट्रॉल हा शरीरात आढळणारा मेणासारखा पदार्थ असून तो मुख्यतः लिव्हरमध्ये तयार होतो. याशिवाय मांस, अंडी, दूध आणि इतर पदार्थांमधूनही तो शरीरात पोहोचतो. शरीरातील पेशी तयार करण्यासाठी आणि काही महत्त्वाचे हार्मोन्स बनवण्यासाठी कोलेस्ट्रॉल आवश्यक असतं. मात्र त्याचं प्रमाण वाढल्यास अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

चांगले आणि वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?

कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. एचडीएल (HDL) हे चांगलं कोलेस्ट्रॉल मानलं जातं तर एलडीएल (LDL) हे वाईट कोलेस्ट्रॉल समजलं जातं. शरीरात एलडीएलचं प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचू लागते आणि त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

लाल मांस, लोणी, तूप आणि फुल-फॅट दुग्धजन्य पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असतं. हे वाईट कोलेस्ट्रॉल वाढवू शकतं. त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन कमी करून ऑलिव्ह ऑइल, अवाकाडोसारख्या पदार्थांमधील हेल्दी फॅटचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं.

नियमित व्यायामाची सवय

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. आठवड्याला किमान 150 मिनिटं मध्यम स्वरूपाचा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. चालणं, सायकलिंग, जॉगिंग किंवा पोहणं यासारख्या क्रिया हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे केवळ कोलेस्ट्रॉलच नव्हे तर इतर अनेक आजारांचा धोकाही कमी होतो.

वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं

जास्त वजनामुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढू शकते. शरीराचे केवळ 5 ते 10 टक्के वजन कमी झालं तरी कोलेस्ट्रॉलच्या पातळीत चांगला बदल दिसून येऊ शकतो. त्यामुळे निरोगी वजन राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

धूम्रपान सोडल्यास मिळू शकतो मोठा फायदा

धूम्रपानाचा थेट परिणाम चांगल्या एचडीएल कोलेस्ट्रॉलवर होतो. सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केल्याने एचडीएलचं प्रमाण कमी होतं. धूम्रपान सोडल्यानंतर चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारू लागते आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते.

मद्यपानावर ठेवा नियंत्रण

अतिप्रमाणात मद्यपान केल्यास ट्रायग्लिसराइड्स आणि एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. त्यामुळे मद्यपान करत असाल तर ते मर्यादित प्रमाणातच करणं योग्य ठरतं.

पुरेशी झोपही तितकीच महत्त्वाची

अनेक संशोधनांमध्ये अपुऱ्या झोपेचा संबंध वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्याशी आणि चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होत असल्याशी दिसला आहे. त्यामुळे दररोज किमान 7 ते 9 तासांची शांत आणि दर्जेदार झोप घेणं आवश्यक आहे.

फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा

ओट्स, बार्ली, राजमा, विविध कडधान्ये, मसूर डाळ आणि सफरचंद यांसारख्या पदार्थांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. हे फायबर अन्नातून शरीरात जाणारं अतिरिक्त कोलेस्ट्रॉल शोषलं जाण्यापासून रोखण्यास मदत करतं.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : मोठी बातमी! मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा बदल, बडे नेते राजीनामा देणार

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

Shraddha Kapoor - Eetha : तैयार हो, आ रही है 'ईठा'; श्रद्धा कपूरची ठसकेबाज लावणी पाहून प्रेक्षकांची विकेट पडली, चित्रपटात मराठी अभिनेत्याची वर्णी|VIDEO

Fatty liver disease: मद्यपान न करताही लिव्हर होतंय खराब? फॅटी लिव्हरच्या या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक अपडेट, लोहगड दुर्घटनेआधीचा रोमँटिक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT