Baby Names List Saam TV
लाईफस्टाईल

Baby Names List : नवरात्रोत्सवात जन्मलेल्या मुलांसाठी सुंदर नावे; देवीशी जोडला आहे अर्थ

Baby Born in Navratri Name List : नवरात्रीमध्ये जन्मलेल्या लहान मुलांच्या नावाची यादी आणि त्यांच्या नावाचा अर्थ येथे देण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

नवरात्रीत हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीच्या घरी देवीच्या पुजेची तयारी सुरू असते. हे नऊ दिवस ज्यांच्या घरी देवी असते ते देवीची मनोभावे पुजा करतात. त्याने देवी प्रसन्न व्हावी यासाठी सुद्धा मोठी मेहनत घेतली जाते. अशात या काळात म्हणजे ९ दिवसांत तुम्हाला मुलगा किंवा मुलगी झाली तर? या दिवसांमध्ये नवीन पाहुणा घरी येणे म्हणजे सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असते. या काळात जन्मलेलं बाळ फार भाग्यवान मानलं जातं. त्यामुळे आज या बाळांसाठी काही स्पेशल नावांची यादी आम्ही सिलेक्ट केली आहे.

मुलांची नावे

अद्वैक

तुम्हाला मुलगा झाला असेल तर त्यासाठी तुम्ही अद्वैक नाव ठेवू शकता. अद्वैक म्हणजे महादेव अशी व्यक्ती जी नेमही लख्ख प्रकाशात चमकत असते.

केयोन

केयोन नाव सुद्धा फार सुंदर आहे. मुलांसाठी हे नाव ठेवू शकता. या नावाचा अर्थ उगवता सूर्य असाही होतो.

छायांक

जर तुमच्या बाळाचा जन्म रात्री किंवा सायंकाळी झाला असेल तर त्याचं नाव छायांक ठेवा. छायांक म्हणजे सावली आणि चंद्राची छाया असा होतो.

तालंक

तालंक म्हणजे शुभ. बाळाचा जन्म शुभ काळात झाल्याने तुम्ही त्याचं नाव तालंक असं ठेवू शकता. या नावाची मुलं फार भाग्यवान ठरतात.

फाल्गु

बाळाचं नाव फाल्गु ठेवत असाल तर त्याचा अर्थ सुंदर असा होतो.

मादेश

मादेश या नावाचा अर्थ देखील महादेवाच्या नावाशी प्रतिमेशी आणि कार्याशी जोडला आहे.

अयान

अयानचे दोन अर्थ होतात एक म्हणजे देवावर असलेले अलंकार. तसेच दुसरा अर्थ म्हणजे चांगले भाग्य होय.

आकर्ष

मुलासाठी हे सुंदर नाव आहे. या नावाचा अर्थ आकर्षण असाही होतो.

मुलींच्या नावांची यादी

इशिता

इशिता म्हणजे महानता, सर्वश्रेष्ठ आणि सर्वोच्च स्थान होय.

किमाया

किमाया नाव मुलीचं ठेवू शकता. याचा अर्थ दिव्य, दैवीय आणि शक्ती असा होतो.

लावण्या

नवरात्रीत घरी देवीचा जन्म झाला म्हणजे तिचं नाव लावण्या ठेवू शकता. याचा अर्थ सुंदरता असा देखील होतो.

जोया

जोया या नावाचा अर्थ प्रकाश असा आहे. त्यामुळे तुम्ही मुलीचं नाव हे ठेवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT