नवजात बाळाला काही वेळानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने केस विंचरणे योग्य राहते. त्यामुळे बाळाच्या केसांची चांगली वाढ होते.
मुलांचे केस विंचरल्याने त्यांच्या डोक्याला आराम मिळतो. तसेच केस निरोगी राहण्यास देखील मदत होते.
केसांवर कंगवा फिरवल्याने बाळाला रिलॅक्स वाटते. त्यामुळे त्याला निवांत झोपही लागते.
लहान मुलांचे केस विंचरण्यासाठी मऊ ब्रशचा वापर केल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसेच केसांची वाढही चांगली होते.
तसेच लहान वयापासूनच केस विंचरल्यास त्यांना चांगले वळण येते. ज्यामुळे मुलांचा लूक सुंदर होतो.
नवजात बाळाचे केस विंचरताना लक्षात घ्या की, बाळाचा टाळू आणि केस खूप नाजूक असतात. त्यामुळे त्यांना दुखापत होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
बाळाचे केस विंचरण्यासाठी सॉफ्ट ब्रिस्टल हेअर ब्रशचा वापर करावा. तसेच केस विंचरण्यापूर्वी तेल लावायला विसरू नये.
जर तुमच्या बाळाच्या टाळूवर चट्टे किंवा कोरडेपणा असेल तर नियमित बाळाच्या केसांवरून हळूवार कंगवा फिरवा. यामुळे ही समस्या दूर होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.