जगात होणारी युद्ध, हवामानामुळे होणारे मोठे बदल या गोष्टी समोर असतानाच एका रहस्यमयी भविष्यवाणीने लोकांची झोप उडवली आहे. बल्गेरियाचे प्रसिद्ध भविष्यतज्ज्ञ बाबा वेंगा यांनी आतापर्यंत अनेक भाकितं केली आहेत. त्यांनी अनेक भाकितं खरी देखील ठरली आहेत. दरम्यान बाब वेंगा यांनी केलेली एक भविष्यवाणी आता समोर आली आहे.
परवा म्हणजेच ७ जून या तारखेबाबत बाबा वेंगा यांनी एक भाकित केलं होतं मुळात ७ जून ही तारीख २०२५ सालासाठी खूप खास आणि धोकादायक असल्याचे वर्णन बाबा वेंगा यांनी केलं होतं.
खगोलशास्त्रज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि गुप्तचर संस्थांकडून मिळालेले अहवाल देखील या तारखेबद्दल गंभीर संकेत देत असल्याचं समोर आलं आहे. ग्रहांची हालचाल, विशेषतः मंगळाच्या राशीतील बदल, केवळ राजकीय आणि नैसर्गिक अशांततेचे संकेत देत नाही तर मानसिक आणि जागतिक असंतुलनाकडे देखील निर्देश करतायत. बाबा वेंगाची भविष्यवाणी पुन्हा एकदा खरी ठरेल का? या तारखेची संपूर्ण कहाणी आणि त्यामागील रहस्यं काय आहे ते पाहूयात.
बाबा वांगा ही एक अंध बल्गेरियन महिला होती ज्यांनी तिच्या आयुष्यात अनेक जागतिक घटनांबद्दल आश्चर्यकारक भाकितं केली होती. १९९६ मध्ये बाबा वेंगा यांचं निधन झालं होतं. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी कथित रेकॉर्ड केलेली भाकितं ५०७९ पर्यंत आहेत. २०२५ बद्दलच्या त्यांच्या भविष्यवाण्या गंभीर चर्चेचा विषय आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, ७ जून रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. जो युद्ध, संघर्ष, अपघात आणि जाळपोळ यांचा कारक मानला जातो. खगोलशास्त्रज्ञ या दिवशी पृथ्वी आणि सूर्य यांच्यात तीव्र चुंबकीय हालचाली होणार असल्याचं म्हणतायत. ज्यामुळे हवामान आणि मानसिक स्थिती दोन्ही प्रभावित होऊ शकतात.
नासाच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये सूर्याची गतीशिलता शिगेला पोहोचणार आहे. ज्यामुळे सौर वादळांची शक्यता वाढू शकते. या वादळांचा संपर्क प्रणाली आणि उपग्रहांवर परिणाम होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.