Ayodhya Sarayu River Saam Tv
लाईफस्टाईल

Ayodhya Sarayu River : अयोध्येतील सरयू नदी श्रीरामाला अधिक प्रिय... पण भगवान शंकराने दिला होता शाप, जाणून घ्या यामागचे रहस्य

Ayodhya Ram Mandir : २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. या दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.

कोमल दामुद्रे

Sarayu River Significance :

२२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. या दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.

अशातच प्रभू रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत राम मंदिर तयार करण्यात आले आहे. यानिमित्ताने सरयू नदीचा उल्लेख सतत होत आहे. सरयू नदीशिवाय अयोध्येची कथा अपूर्णच. भगवान श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येतून वाहणाऱ्या या नदीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. सरयू नदीचे महत्त्व जाणून घेऊया.

1. सरयू नदीचे महत्त्व

नदीत (River) स्नान करण्याचे महत्त्व रामचरित मानसमध्ये सांगण्यात आले आहे. उत्तरवाहिनी सरयू नदी अयोध्येच्या उत्तर दिशेहून वाहाते. एकदा श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितले की, सरयू नदी पवित्र असून येथे सर्व यात्रेकरु दर्शनासाठी आणि स्नानासाठी येतात. या नदीत स्नान केल्याने सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे पुण्य प्राप्त होते. असे म्हटले जाते की, ब्रम्ह मुहूर्तावर सरयू नदीत स्नान करणाऱ्या व्यक्तीला सर्व पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे फळ मिळते. पौराणिक कथेनुसार सरयू आणि शारदा नद्यांचा संगम झाला आहे, सरयू आणि गंगा यांचा संगम श्रीरामांच्या (Ram) पूर्वजांनी केली होता.

2. सरयू नदीची उत्पत्ती कशी झाली?

पौराणिक कथेनुसार सरयू नदीची उत्पत्ती भगवान विष्णूच्या डोळ्यांतून झाली असे म्हटले जाते. प्राचीन काळी शंखासुर नावाच्या राक्षसाने वेद चोरुन समुद्रात फेकले, कुणीही पकडून नये म्हणून लपून बसले होते. यानंतर भगवान विष्णूंनी माशाचे रुप धारण करुन राक्षसांचा वध केला. त्यावेळी भगवान विष्णूंनी ब्रम्हदेवाला वेद सुपूर्द करुन आपले खरे रुप धारण केले. यावेळी भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ब्रम्हाजींनी हे अश्रू मानसरोवरात ओतले. राक्रमी वैवस्वत महाराजांनी बाण मारून हे पाणी मानसरोवरातून बाहेर काढले. त्या पाण्याच्या प्रवाहाला सरयू नदी असे म्हणतात.

3. शंकराने का दिला सरयू नदीला शाप?

श्रीरामाने सरयू नदीत जलसमाधी घेतली. प्रभू रामाने सरयू नदीतच आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे भगवान शंकर (Lord Shiva) क्रोधित झाले आणि सरयू नदीला शाप दिला की मंदिरात अर्पण करण्यासाठी तुझ्या पाण्याचा वापर केला जाणार नाही. तसेच कोणत्याही पूजेच्या वेळी तुझे पाणी वापरले जाणार नाही.

यानंतर सरयू नदीने शंकराची माफी मागितली त्यानंतर अनेक विनवण्या केल्यानंतर सरयू नदीला सांगितले की, मी माझा शाप परत घेऊ शकत नाही परंतु, तुझ्या पाण्यात स्नान केल्याने अनेक लोकांची पापे धुतली जातील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT