Lemon juice benefits, lemon juice side effects, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

चुकीच्या पध्दतीने लिंबू पाणी प्यायल्याने होऊ शकते नुकसान

कोमल दामुद्रे

मुंबई : अचानक चक्कर किंवा मळमळत असले की, आधी आपण लिंबू पाणी पितो. आपल्याला डिहायड्रेशनची समस्या जाणवू लागली की, तेव्हा ही आपण लिंबू पाण्याचे सेवन करतो परंतु, त्याचे सेवन चुकीच्या पध्दतीने केल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

हे देखील पहा -

लिंबामध्ये जीवनसत्त्व क चे प्रमाण हे मुबलक असते, ज्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवता येते. यामुळे आपल्याला सर्दी, फ्लू आणि हंगामी रोगांपासून लढण्यास मदत करते. इतकेच नाही तर लिंबूपाणी शरीराला डिटॉक्सिफाय करते, ज्यामुळे वजन कमी (Weight loss) होण्यास मदत होते. सामान्यतः लोकांना पुरेसे साधे पाणी (Water) पिणे शक्य नसते, अशा परिस्थितीत लिंबूपाणी सेवन केल्यास शरीरातील हायड्रेशन लेव्हल राखण्यास मदत होते. लिंबू पाणी पिताना काही चुका केल्यातर आपल्याला शरीराला त्यामुळे नुकसान होऊ शकते. जाणून घेऊयात त्या चुकीच्या पध्दती.

१. बरेच लोक आपल्या दिवसाची सुरूवात ही लिंबू पाण्याने करतात. यावेळी शरीरातील मेटाबॉलिक रेट जास्त असल्याने आणि अशा स्थितीत लिंबूपाणी प्यायल्यास त्याचा आरोग्याला फायदा होतो. तसेच या वेळी एक पेक्षा अधिक ग्लास लिंबू पाण्याचे सेवन करु नये. लिंबात आम्लयुक्त पदार्थ असल्यामुळे याच्या अतिसेवनाने अॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते.

२. थंड पाण्यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला नुकसान होते. यासाठी याचे सेवन कोमट पाण्यात केल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतील.

३. काही लोक पाण्यात फक्त लिंबू पिळून त्याचे सेवन करतात यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात. लिंबू पाणी पिताना त्यात मध घातल्यास त्याची पीएच पातळी संतुलित राहण्यास मदत होते.

४. काही लोकांना सवय असते की ते दिवसभर लिंबू पाणी पित असतात.लिंबूपाणीचे अतिसेवन केल्याने टूथ इनॅमलची समस्या उद्भवू शकते. याऐवजी आपण दिवसभरात ताक, ज्यूस किंवा नारळाचे पाणी पिऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

SCROLL FOR NEXT