मुंबई : पावसाळ्यात आपल्याला आरोग्याबरोबर आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. पावसाळ्यात त्वचेत अधिक आर्द्रता निर्माण होते व त्यामुळे त्वचेवर तेल येऊ लागते. (Oily Skin In rainy Season)
हे देखील पहा -
पावसाळ्यात त्वचेची काळजी घेतली नाही तर आपल्याला मुरुमे व त्वचेच्या इतर समस्येना सामोरे जावे लागू शकते. या ऋतूत त्वचेची अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या ऋतूत आपल्या त्वचेची चमक कशी टिकवून ठेवता येईल यावर आपण भर द्यायला हवा. या दिवसात सुंदर दिसण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.
१. पावसाळ्यात त्वचा सतत २ ते ३ वेळा दिवसातून स्वच्छ करावी. जेल असणारे मॉइश्चरायझरची निवड करा. आठवड्यातून एकदा तरी चेहऱ्यावर बर्फ लावा. फाउंडेशन वापरणे टाळा. ब्लशसाठी टिंट्स वापरा. डेड स्किन एक्सफोलिएट करण्यासाठी चेहरा स्क्रब करा. आय-लाइनर किंवा काजल वापरणे टाळा. फक्त वॉटरप्रूफ मस्करा वापरा.
२. त्वचेची स्वच्छता राखण्यासाठी आपल्याला चेहरा धुणे अंत्यत गरजेचे आहे. चेहरा धुतल्यामुळे त्याच्या भागातील रक्ताभिसरण आणि त्वचेचे हायड्रेशन वाढते.
३. चेहऱ्यावर अतिरिक्त चमक आणण्यासाठी त्वचा ओलसर असताना टोनर वापरा. हे त्वचेची पातळी संतुलित करून बाहेरील प्रदुषणापासून त्वचेचे रक्षण करु शकते.
४. त्वचेचे (Skin) रक्षण करण्यासाठी हायलुरोनिक आणि व्हिटॅमिन (Vitamins) सी सीरम वापरू शकतो. हे त्वचेचे अकाली वृद्धत्व टाळण्यास देखील मदत करते, काळे डाग घालवते व त्वचा एक्सफोलिएट करते यामुळे चेहरा तणावमुक्त राहतो.
५. मेकअपमुळे केल्यामुळे त्वचेला कोरडेपणा येऊ शकतो त्यामुळे आपला चेहरा खराब दिसेल. यासाठी आपण जेल आधारित मॉइश्चरायझर्सची निवड करा. कारण हे त्वचेत सहज प्रवेश करतात यामुळे त्वचेला तेलकटपणा येत नाहीत व धूळ त्वचेला चिकटण्यापासून टाळतात. (Skin Care In Rainy Season)
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.