Navratri Detox Diet Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri Detox Diet : वाढत्या वजनामुळे नवरात्रीत उपवास करताय? डिटॉक्स डाएट ठरेल फायदेशीर, पाहा कसे

Avoid This Food on Navratri : नवरात्रीमध्ये उपवास करताना डाएटिंगच्या काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

कोमल दामुद्रे

Navratri Festival :

नवरात्रौत्सव सुरु झाला असून अनेकांचा ९ दिवस उपवास असेल. दुर्गा देवीची आशिर्वाद मिळावा आणि शरीरात ऊर्जा टिकून राहावी यासाठी अनेक भक्त उपवास करतात. परंतु यामध्ये काही लोक असे आहेत जे वाढत्या वजनावर उपाय म्हणून उपवास करतात.

हल्ली डिटॉक्स डाएटचे फॅड सर्वत्र पाहायला मिळत आहे. या उपवासाच्या दरम्यान आपल्या खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टी बदलतात ज्याचा परिणाम शरीरावर होतो. या ९ दिवसात पोटात अनेक हेल्दी पदार्थ जातात. जंक फूड खाण्यापासून सुटका मिळते तसेच काही प्रमाणात शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उपवासाच्या वेळी खाल्ले जाणारे बकव्हीट, वॉटर चेस्टनट आणि राजगिरा हे फायबर, प्रोटीन आणि अँटी ऑक्सिडंट पॉलीफेनॉलचे उत्कृष्ट स्रोत आहेत. यामध्ये असणारे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबर पचनास कमी करतात आणि भरपूर पोषण देतात. नवरात्रीमध्ये उपवास करताना डाएटिंगच्या काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

1. नवरात्रीत डिटॉक्स डाएटसाठी काय करावे आणि काय करू नये

काय करावे

  • नियमित अंतराने खा.

  • भूक भागवण्यासाठी दही (Curd), काकडी आणि फळे खा.

  • स्वतःला नेहमी हायड्रेटेड ठेवा. पाणी (Water), सबजा यांसारख्या थंड गोष्टी प्या.

  • जेव्हा शक्य असेल तेव्हा खाण्यासाठी निरोगी स्नॅक्स (Snacks) निवडा.

काय करू नये

  • जास्त वेळ पोट रिकामे ठेवू नका.

  • मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ नका.

  • सकाळी भूक लागल्यास रात्री जास्त खाऊ नका.

  • पाण्याची कमतरता भासू देऊ नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: तिसऱ्या फेरीनंतर बुलढाण्यात कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

SCROLL FOR NEXT