Diwali 2024 Do's and Don't saam tv
लाईफस्टाईल

Diwali 2024: दिवाळीच्या दिवसांत तुमच्या हातून 'या' चुका टाळा; लक्ष्मी नाराज होण्याचा धोका

Diwali 2024 Do's and Don't: मोठ्या उत्साहात देशभरात दिवाळी साजरी केली जातेय. दिवाळीत काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. या काळात जर तुम्ही नियमांचं पालन केलं नाही तर देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळीला सुरुवात झाली असून मोठ्या उत्साहात देशभरात दिवाळी साजरी केली जातेय. हिंदू धर्मात या सणाला मोठं महत्त्व देण्यात आलं आहे. आज ३१ ऑक्टोबर असून आजच्या दिवशी हा सण साजरा करण्यात येणार आहे. आजच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेश यांची पुजा केली जाते.

मात्र शास्त्रानुसार, या काळात काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. दिवाळीत काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. या काळात जर तुम्ही नियमांचं पालन केलं नाही तर देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. जाणून घेऊया दिवाळीच्या दिवशी काय केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

दिवाळीत काय करू नये?

  • दिवाळीत घरात कोणतीही घाण ठेवू नये. अशा ठिकाणी लक्ष्मी देवी वास करत नाही.

  • दिवाळीच्या मुहूर्तावर घरी आलेल्या पाहुण्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये

  • दिवाळीत जुगार खेळू नये. तसंच दारू पिणं किंवा आणि मसालेदार पदार्थ खाऊ नये

  • दिवाळीत कोणाकडूनही कर्ज घेऊ नये.

  • या दिवसांत कोणत्याही महिलेचा अपमान करू नका.

  • या दिवशी कोणाशीही भांडण करू नये.

दिवाळीच्या दिवसांत 'या' गोष्टी अवश्य करा

  • दिवाळीनिमित्त संपूर्ण घराची नीट स्वच्छता करावी

  • दिवाळीच्या प्रत्येक दिवशी घरात रांगोळी आणि फुलांनी सजवा.

  • शुभ मुहूर्तावर लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करा.

  • दिवाळीच्या निमित्ताने वाईट सवयी सोडून चांगल्या कृती आणि सवयी अंगीकारा.

  • या दिवसांत दान-धर्म करणं शुभ मानलं जातं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

Nandurbar News: अंत्यसंस्कारासाठी जीवघेणा प्रवास, आदिवासींच्या यातना संपेना|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात शॉक सर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Mobile Recharge : 400 रुपयांमध्ये 400GB डेटा, धमाकेदार ऑफर

Government Jobs: दहावी उत्तीर्ण असाल तरी नौदलात मिळेल नोकरी; जाणून घ्या पगार अन् अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT