Atum 1.0 Electric Bike Imge
Atum 1.0 Electric Bike Imge Saam Tv
लाईफस्टाईल

'ही' बाइक फक्त ७ रुपयांत १०० किमी धावेल, बुकिंग रक्कम हजाराखाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : हैदराबादच्या एका प्रसिद्ध स्टार्टअप कंपनीने (Atumobile Private Limited) आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक 'Atum १.०' बाजारात आणली आहे. जिथे महागडी इलेक्ट्रिक वाहने ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहेत, तिथे परवडणाऱ्या किंमतीत येणारी ही इलेक्ट्रिक बाइक ग्राहकांना आवडू शकते. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीत इलेक्ट्रिक वाहने अधिक किफायतशीर पर्याय आहेत. या इलेक्ट्रिक बाइकचा वापर केल्याने पैशांची बचत होते तसेच पर्यावरण प्रदूषित होण्यापासून वाचवता येते.

Atum १.० ची किंमत नक्की किती ?

या इलेक्ट्रिक बाइकच्या किंमती विषयी बोलायचे झाले तर, या इलेक्ट्रिक बाइकची किंमत ७४,९९९ रुपयांपासून सुरुवात होत आहे. त्याचबरोबर या इलेक्ट्रिक बाइकला ९९९ रुपयांमध्ये बुक करू शकतो.

Atum१.० रेंज आणि चार्जिंग स्पीड

चार्जिंगच्या वेळेबद्दल बोलायचे झाले तर, या इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी केवळ ३.५ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी सहज चार्ज केली जाऊ शकते. कारण यात तीन-पिन प्लग चार्जर मिळतो, जो अत्यंत कार्यक्षम आणि आरामदायक आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही इलेक्ट्रिक बाइक १०० किलोमीटरपर्यंत चालू शकते. मायलेज पाहता, ही इलेक्ट्रिक बाइक फक्त ७-१० रुपयांमध्ये १०० किलोमीटरपर्यंत धावते. जे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहे.

Atum १.० वैशिष्ट्ये आणि तपशील

कंपनी या बाइकच्या मोटारसाठी दोन वर्षांची वॉरंटी देता आहे. तर बॅटरीवर तीन वर्षांची वॉरंटी उपलब्ध आहे. सोपे रिझोल्यूशन, जलद सेवा आणि स्पेअर पार्ट्सची उपलब्धता यामुळे ही बाइक अधिक आकर्षक बनते. या बाइकमध्ये १४ लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे.

यामध्ये दिलेली आसनव्यवस्था तरुण आणि वृद्ध दोघांसाठीही उत्तम आहे. या बाइकच्या उच्च ग्राउंड क्लीयरन्समुळे ही बाइक कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर चालण्यास आरामदायी बनते. ही बाईक चालवणे अगदी सोपे आहे. त्यामुळे नेहमी सर्व्हिस सेंटरला जाण्याची गरज भासत नाही. वजनाने हलकी असल्याने ही बाइक सर्व वयोगटातील चालक वापरू शकतात. सुरक्षित गतीमुळे ही बाइक अधिक आरामदायक आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही बाइक चालवण्यासाठी परवान्याची गरज नाही. नोंदणी केली नसली तरी कोणत्याही प्रकारच्या चालानची भीती नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Crisis Hits Maharashtra: पाणीसाठ्यात घट, नंदुरबारमध्ये 195 गावांना टंचाईच्या झळा; मालेगाव, हरसुलमध्ये भीषण स्थिती

Today's Marathi News Live : रोहित वेमुला मृत्यू प्रकरणाचा पुन्हा तपास होणार

IRCTC Hotel Service : स्टेशनवर 100 रुपयांत मिळणार हॉटेलसारखी रूम; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Amaravati Express Fire : दादर रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेसला आग, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

CBSE Results 2024: प्रतीक्षा संपली! सीबीएसई १० आणि १२ वीचा निकाल कधी लागणार? महत्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT