Asus ROG Phone 7  Saam Tv
लाईफस्टाईल

Asus ROG Phone 7 : 'गेमिंग लव्हर्स'साठी लॉन्च होतोय Asus ROG Phone 7, 16GB रॅमसह मिळेल जबरदस्त फीचर्स

Asus ROG Phone 7 Launch : Asus आज भारतात आपला Nex गेमिंग स्मार्टफोन ROG Phone 7 लॉन्च करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

New Gaming Phone Launch Today : Asus आज भारतात आपला Nex गेमिंग स्मार्टफोन ROG Phone 7 लॉन्च करणार आहे. भारतासोबतच हा स्मार्टफोन आज अमेरिका आणि तैवानमध्येही लॉन्च होणार आहे. हा कार्यक्रम कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर थेट प्रवाहित केला जाईल. लाईव्ह-स्ट्रीम व्हिडिओची लिंक खाली दिली आहे. आगामी स्मार्टफोन सीरीज दोन प्रकारात येईल.

यामध्ये बेस ROG फोन 7 मॉडेल (Model) आणि ROG फोन (Phone) 7 अल्ट्राचा समावेश आहे. हे दोन्ही स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 चिपसेटने सुसज्ज असू शकतात. अशी शक्यता आहे की ROG Phone 7 सीरीज (Series) त्याच्या जुन्या प्रकारातील 6000mAh बॅटरी टिकवून ठेवेल आणि 65W जलद चार्जिंग सपोर्टसह येऊ शकेल.

फीचर्स -

Asus ROG 6 सीरीज 165Hz रिफ्रेश रेट आणि 720Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.78-इंच फुल HD+ AMOLED डिस्प्लेसह येते. अशी शक्यता आहे की 7 सीरीजमध्ये मागील वेरिएंट प्रमाणेच डिस्प्ले स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स असतील, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz देखील असेल.

कॅमेरा आणि स्टोरेज -

Asus ROG Phone 6 सीरीजमध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony IMX766 प्राथमिक कॅमेरा, 13-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा (Camera) आणि 5-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Asus ROG फोन 6 भारतात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलमध्ये आला होता आणि त्याची किंमत 71,999 रुपये होती. ROG Phone 6 Pro 89,999 रुपयांमध्ये 18 GB रॅम आणि 512 GB स्टोरेजसह सिंगल स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये देखील येतो. अशा परिस्थितीत आगामी ROG Phone 7 सीरीजची किंमत सुमारे 70,000 रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT