ASUS ROG Ally Saam Tv
लाईफस्टाईल

Gaming Console: गेमिंग प्रेमींसाठी आनंदाची बातमी! येत आहे ASUS ROG Ally, जाणून घ्या किंमत आणि ऑफर

गेमिंग प्रेमींसाठी आनंदाची बातमी! येत आहे ASUS ROG Ally, जाणून घ्या किंमत आणि ऑफर

Satish Kengar

Gaming Console: भारतीय गेमिंग प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ASUS आपले बहुप्रतिक्षित हँडहेल्ड Windows PC कन्सोल, ASUS ROG Ally भारतीय बाजारपेठेत आणण्यासाठी सज्ज आहे. 12 जुलैपासून हा डिव्हाईस ASUS एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स, ASUS eShop आणि Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध असेल.

या डिव्हाईसच्या खरेदीसाठी कंपनीने 7 जुलै रोजी फ्लिपकार्टवर विशेष फ्लॅश सेलची घोषणा केली आहे. या गेमिंग डिव्हाईसची किंमत किती आहे आणि काय आहे यात खास, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

किंमत आणि ऑफर

भारतात याची किंमत 69,990 रुपये असेल आणि याचा एकमेव प्रकार देशात लॉन्च केला जाईल. जो पॉवरफुल AMD Ryzen Z1 Extreme चिपसह सुसज्ज असेल. याशिवाय पहिल्या 200 ग्राहकांसाठी Asus ची खास ऑफर देखील आहे. (Latest Marathi News)

कंपनीने म्हटले आहे की, जे ग्राहक 12 जुलै रोजी Asus eShop किंवा Asus Stores मधून ROG Allie खरेदी करतील, त्यांना 2000 रुपये किमतीचा ROG Allie केस मिळेल, जो स्टँड म्हणून देखील वापरला जाऊ शकतो.

16GB रॅम आणि 512GB स्टोरेज

Asus ROG Alli Windows 11 वर चालत असू हा 16GB RAM ने सुसज्ज आहे. यात 512GB पर्यंत स्टोरेज मिळते. कन्सोलमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 7ms प्रतिसाद वेळेसह 7-इंचाचा 1080p IPS पूर्ण HD डिस्प्ले आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी अनेक पोर्ट

कनेक्टिव्हिटीसाठी याला 3.5mm कॉम्बो ऑडिओ जॅक आणि ROG XG मोबाइल इंटरफेस USB Type-C कॉम्बो पोर्टसह अनेक पोर्ट देण्यात आले आहेत. जे Nvidia GeForce RTX 4090 GPU पर्यंत सपोर्ट करते. यात मायक्रोएसडी कार्ड रीडर आणि मल्टीप्लेअर गेमिंगसाठी दोन कंट्रोलर कनेक्ट करण्याची क्षमता देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या तरुणाला अटक

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT