Vehicle Dashboard Warning Light : सावधान! वाहनांवरच्या डॅशबोर्डवर असलेल्या सिंबॉल लाईटकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा..

Car Dashboard Symbols Meanings : तुम्ही डॅशबोर्डवर दिसणार्‍या काही चिन्हांची काळजी घेतली पाहिजे.
Vehicle Dashboard Warning Light
Vehicle Dashboard Warning Light SaamTv
Published On

What Is The Meaning Of Warning Light : जर तुम्ही तुमच्या कारची वेळेवर सर्व्हिसिंग केली नाही तर तुम्हाला नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही डॅशबोर्डवर दिसणार्‍या काही चिन्हांची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला वाटेत मधेच अडचण येऊ नये.

कारमध्ये अशी काही यंत्रणा बसवण्यात येते ज्याने इंजिनपासून (Engine) बॅटरीपर्यंत प्रत्येक समस्येशी संबंधित सिग्नल आपल्या कारच्या डॅशबोर्डवर वॉर्निंग लाईट्सच्या स्वरूपात उपस्थित असतात. तुमच्या कारच्या डॅशबोर्डवर अनेक डिझाईन्सने सिंबॉल बनवल्या जातात आणि जेव्हा समस्या येते तेव्हा हा वॉर्निंग लाईट्स केशरी रंगात चमकतात किंवा सतत चमकू लागतो.

Vehicle Dashboard Warning Light
Vehicle Scrapping: जुन्या वाहनांची भंगार केंद्रावर किंमत कशी ठरवतात? जाणून घ्या प्रक्रिया

ब्रेक वॉर्निंग लाईट

वर्तुळाच्या आत लाल रंगाचा दिवा असतो जो वाहनांच्या (Vehicle) ब्रेकमध्ये काही समस्या आल्यास चमकतो. कारण वाहनांमध्ये ब्रेक ही सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे त्वरित तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. दरम्यान कमी ब्रेक फ्लुइडची पातळी कमी असतानाही हा लाईट चमकतो.

इंजिन/ECU ​​अलर्ट

हे फक्त खराब इलेक्ट्रिक सेन्सर दर्शवू शकते, परंतु ते यांत्रिक समस्या (Problem) देखील सूचित करू शकते. हा लाईट दिसत असतानाही तुम्ही कार चालवली तर तुमचे खूप नुकसान होऊ शकते.

Vehicle Dashboard Warning Light
Car Servicing Care Tips : वाहनांची सर्व्हिंसिंग झाल्यावर या 4 गोष्टी तपासा, अन्यथा होईल नुकसान

बॅटरी चार्ज

जेव्हा तुम्ही तुमची कार सुरू करता तेव्हा हा लाईट दिसू लागतो, परंतु 1-2 सेकंदांनंतर तो पुन्हा बंद होईल. हा लाईट सतत चालू राहिला तर याचा अर्थ तुमच्या कारच्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये समस्या आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com