Janmashtami 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Janmashtami 2024 : जन्माष्टमीनिमित्त बाळ कृष्णाला 'या' रंगाच्या कपड्यांनी सजवा; आयुष्यातील सर्व संकटांचा होईल नायनाट

Janmashtami Shri Krishna Colours According To Rashi : घरातील मुख्य सदस्याच्या राशीनुसार बाळ कृष्णाला विविध रंगाचे कपडे परिधान केले पाहिजे. असे केल्याने त्या त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असं ज्योतिशास्त्रात म्हटलं आहे.

Ruchika Jadhav

भारतात उद्या (२६ ऑगस्ट २०२४) सर्वत्र मोठ्या उत्साहात कृष्ण जन्मोस्तोव साजरा केला जात आहे. श्री कृष्णाचा जन्म दिवस असल्याने प्रत्येकाच्या घराघरात बाळ कृष्णाची मूर्ती सजवली जाते. तुम्ही देखील विविध रंगाच्या सुंदर कपड्यांनी बाळगोपाळाला सजवत असाल. बाळगोपाळाला सजवून प्रत्येक घरात त्याची मनोभावे पुजा केली जाते.

पुजा करताना विविध अभूषणे मूर्तीवर ठेवली जातात. आपल्या घरातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि कुटुंबात मोठी भरभराट व्हावी अशी मागणी प्रत्येक व्यक्ती बाळ कृष्णाकडे करत असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? घरातील मुख्य सदस्याच्या राशीनुसार बाळ कृष्णाला विविध रंगाचे कपडे परिधान केले पाहिजेत. असे केल्याने त्या त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असं ज्योतिशास्त्रात म्हटलं आहे.

मेष

मेष राशीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी पुजा करताना आपल्या बाळकृष्णाला लाल रंगाचे कपडे परिधान केले पाहिजेत. तसेच बाळकृष्णाची अन्य सजावट सुद्धा लाल रंगांच्या मोत्यांनी आणि विविध अभूषणांनी केली पाहिजे. यामुळे संबंधित व्यक्तीच्या जीवनात सुख शांती लाभेल.

वृषभ

वृषभ राशीला शुभ ग्रह शुक्र आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी फक्त पांढऱ्या रंगाचे कपडे आणि पांढऱ्या रंगाचेच दागिने परिधान केले पाहिजेत. त्यामुळे सजावटीसाठी आणि प्रसादासाठी सुद्धा जास्तीत जास्त पांढरा रंग वापरण्याचा प्रयत्न करा.

मिथुन

मिथुन राशीसाठी शुभ बुध ग्रह आहे. बुधाला हिरवा रंग प्रिय आहे. त्यामुळे श्री कृष्णाची पुजा करताना विविध कपड्यांमध्ये हिरवा रंग वापरावा. त्याने तुमची अडकलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होतील.

कर्क

कर्क राशीसाठी चंद्र स्वामी आहे. या राशीच्या व्यक्तींनी बाळ कृष्णाच्या सजावटीसाठी पांढऱ्या रंगाचे वस्त्र वापरावेत.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्य स्वामी आहे. या राशीच्या व्यक्तींनी पुजेवेळी कृष्णासाठी लाल रंगाचे कपडे परिधान केले पाहिजेत.

कन्या

कन्या राशीसाठी बुध स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी श्रीकृष्णाला हिरवे वस्त्र परिधान केले पाहीजे.

तूळ

तूळ राशीसाठी शुक्र स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी श्रीकृष्णाला पांढरे वस्त्र परिधान केरावे.

वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी मंगळ स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या लाल रंगाचे कपडे श्रीकृष्णाला परिधान केरणे उत्तम आहे.

धनु

धनु राशीसाठी बहुस्पती शुभ आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केरणे उत्तम आहे.

मकर

शनि ग्रह मकर राशीसाठी उत्तम आहे. त्यामुळे या व्यक्तींनी कान्हाची पुजा करताना त्याला काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अत्याचं शुभ मानले जाते.

कुंभ

कुंभ राशीसाठी सुद्धा शनि शुभ आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी कान्हा काळ्या रंगाचे कपडे परिधान करा.

मीन

मीनसाठी शुभ बहुस्पति आहे. बहुस्पतिसाठी पिवळा रंग खास आणि शुभ आहे. त्यामुळे तुम्ही या रंगाचे कपडे श्री कृष्णाला परिधान करू शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापूर-सांगली रोडवर भीषण अपघात; दोन कामगारांचा जागीच मृत्यू

PPF Scheme: सरकारची जबरदस्त योजना! दिवसाला ४१६ रुपये गुंतवा अन् ४१.३५ लाख मिळवा

Manoj Jarange : हे सर्व राहुल गांधीच्या सांगण्यावरून करता का? जरांगे पाटलांचा वडेट्टीवारांना सवाल

मोठी बातमी! निलेश घायवळच्या घरावर पोलिसांचा छापा; जप्त केलं मोठं घबाड, पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

Kartiki Yatra : विठुरायाचे घेता येणार २४ तास दर्शन; कार्तिकी एकादशीनिमित्ताने मंदिर समितीचा निर्णय

SCROLL FOR NEXT