Maharashtracha Favourite Kon (MFK) Award Winner
Maharashtracha Favourite Kon (MFK) Award WinnerSaam Tv

Maharashtracha Favourite Kon: महाराष्ट्राची क्रश ठरली महाराष्ट्राचा 'पॉप्युलर फेस'

'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०२२'चा पॉप्युलर फेस हा पुरस्कार हृताला मिळाला आहे.
Published on

Hruta Durgule Become Popular Face of Maharashtra: संपूर्ण महाराष्ट्राची क्रश असलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. हृताने नुकतीच तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०२२'चा पॉप्युलर फेस हा पुरस्कार हृताला मिळाला आहे. हा पुरस्काराला मिळाल्याबद्दल हृताने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Maharashtracha Favourite Kon (MFK) Award Winner
Amitabh Bachchan Meets Messi, Ronaldo: मेस्सी-रोनाल्डोच्या भेटीसाठी बिग बी बच्चन उतरले फुटबॉल मैदानात

छोट्या पडद्यावरील ही स्टार अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सुद्धा झळकत आहे. 'फुलपाखरू' या मालिकेतून हृता घराघरात पोचली. 'मन उडू उडू झालं' या मालिकेवर देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. हृताला २०२२ 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण'चा 'पॉप्युलर फेस' हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्करासह हृताने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने कॅप्शन देत चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.

इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हृताने, 'सर्व प्रेम आणि कौतुकासाठी तुमचे आभार मानू शकत नाही! मी जे आहे ते तुझ्यामुळे आहे. तुझ्यावर प्रेम आणि फक्त प्रेम' असे म्हटले आहे. हृताने तिच्या यशाचे श्रेय तिच्या फॅन्सला दिले आहे. तसेच तिने म्हटले आहे कि ती जे काही आहे ते तिच्या फॅन्समुळे आहे. अनेक मराठी सेलिब्रिटी आणि हृताचे फॅन्स इन्स्टाग्रामवर कमेंटकरून तिचे अभिनंदन करत आहेत.

हृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. हृताचे इन्स्टाग्राम अडीच मिलियन फॉलोवर्स आहेत. आणि म्हणूनच ती महाराष्ट्राची 'पॉप्युलर फेस' ठरली आहे. हृताच्या 'अनन्या' आणि 'टाइमपास ३' या चित्रपटामध्ये दिसली होती. अनन्या चित्रपटातील तिच्या कामाचे प्रचंड कौतुक देखील झाले होते. 'टाईमपास ३'मध्ये हृताचा वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाली होती.

हृता गेला वर्षी विवाहबंधनात अडकली आहे. हृता नेहमीच तिचा पती प्रतीक शाहसोबतचे फोटो आणि आठवणी शेअर करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com