Aston Martin DB12 launched Saam Tv
लाईफस्टाईल

Flagship Car: दिसायला जबरदस्त, इंजिनही दमदार; लॉन्च झाली अ‍ॅस्टन मार्टिनची सुपरकार; किंमत जाणून चाट पडाल

Aston Martin DB12 Launched: दिसायला जबरदस्त, इंजिनही दमदार; लॉन्च झाली अ‍ॅस्टन मार्टिनची सुपरकार; किंमत जाणून चाट पडाल

Satish Kengar

Aston Martin DB12 Launched:

Aston Martin ने भारतीय ऑटो मार्केटमध्ये आपली नवीन सुपरकार DB12 लॉन्च केली आहे. ही कार बाजारात उपलब्ध असलेल्या DB11 ची जागा घेईल. अ‍ॅस्टन मार्टिन रेंजमधील ही फ्लॅगशिप जीटी आहे. DB12 ला सुपर टूरर देखील म्हटले जाऊ शकते.

नवीन DB12 मध्ये 4.0 लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन आहे, जे 671bhp पॉवर आणि 800Nm टॉर्क जनरेट करते. हे जुन्या मॉडेल DB11 पेक्षा अधिक पॉवरफुल आहे. इंजिनला स्टँडर्ड म्हणून 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. यात इलेक्ट्रॉनिक रीअर डिफरेंशियल (ई-डिफ) देखील आहे.

DB12 मध्ये मोठी मेटल ग्रील देण्यात आली आहे. यात नवीन एलईडी लाईट आणि 21-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. याचे इंटीरियर लक्झरी आणि नवीन तंत्रज्ञानाने डिझाइन केले आहे. यात 10.25-इंच स्क्रीनसह नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते. (Latest Marathi News)

DB12 ची एक्स-शोरूम किंमत

यात स्टँडर्ड म्हणून 390 वॅट 11 स्पीकर ऑडिओ सिस्टम आहे. तर Bowers & Wilkins पर्याय देखील उपलब्ध आहे. GT असल्याने DB12 पुरेशी बूट स्पेस देते. ही सुपरकार अतिशय आरामदायक आहे.

अ‍ॅस्टन मार्टिन तुम्हाला तुमच्या आवडीनुसार विविध कस्टमायझेशन पर्याय देखील देते. याची एक्स-शोरूम किंमत 4.59 कोटी रुपये आहे. सध्या, अ‍ॅस्टन मार्टिन देशात डीबीएक्स विकत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

SCROLL FOR NEXT